esakal | कोरोनामुळे भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; तज्ज्ञ म्हणताहेत...
sakal

बोलून बातमी शोधा

Mental_Health

एप्रिल ते ऑगस्ट महिन्यांच्या दरम्यान घेण्यात आलेल्या काही सर्वेमधून ही बाब समोर येत आहे.

कोरोनामुळे भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; तज्ज्ञ म्हणताहेत...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आलं होतं. या काळात नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, आजपर्यंत देश म्हणून मानसिक आरोग्याकडे केलेल्या दुर्लक्षाची मोठी किंमत मोजावी लागेल, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

एप्रिल ते ऑगस्ट महिन्यांच्या दरम्यान घेण्यात आलेल्या काही सर्वेमधून ही बाब समोर येत आहे. डोकेदुखी, चिंता, अनिश्चितता आदी मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. द सुसाईड प्रीव्हेन्शन इन इंडिया फाउंडेशन आणि इंडियन सायकेट्रिक सोसायटीच्या वतीने नुकतेच यासंबंधीचे सर्वेक्षण करण्यात आले.

आता अत्याचार पीडित बालकांना मिळणार जलद न्याय; वाचा सविस्तर!​

सर्वेक्षणाचे निष्कर्ष :
- सर्वेक्षणात सहभागी ४० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना सर्वसाधारण मानसिक समस्या जाणवल्या.
- प्रामुख्याने चिंता आणि अनिश्चितता हे विकार
- डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांपैकी 65 टक्के रुग्णांमध्ये मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत.
- ८५ टक्के लोकांमध्ये थकव्याची समस्या, तर त्यामुळे ७५ टक्के लोकांच्या कामावर परिणाम झाला आहे.

देशासमोरील समस्या :
- सार्वजनिक आरोग्यामध्ये मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष
- २०२०-२१च्या अर्थसंकल्पात २ टक्के तरतूद आरोग्यावर त्यात १ टक्क्यांपेक्षा कमी खर्च मानसिक आरोग्यावर
- समाज म्हणूनही मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष
- मध्यम वर्गात मानसिक विकारांकडे दुर्लक्ष
- डॉक्टर आणि तज्ज्ञांची कमतरता आणि सुविधांचा अभाव

ना सोशल डिस्टन्स, ना कसली भीती; कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी

तज्ञांचा सल्ला : 
- केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे. परंतु दीर्घकालीन उपाययोजनांसह आर्थिक तरतुदींची आवश्यकता
- शालेय स्तरापासून मानसिक आरोग्याविषयी चर्चा आवश्यक. मानसिक आरोग्यासंबंधीच्या अंधश्रद्धांना रोखणे गरजेचे.

देशाची मानसिक आरोग्यासाठीची तयारी :
(स्रोत : जागतिक आरोग्य संघटना अहवाल, २०१६)
१) मानसोपचार तज्ज्ञ (एक लाख लोकांमागे)
भारत : ३
अमेरिका : ११
२) मानसशास्त्रज्ञ (एक लाख लोकांमागे)
भारत : ०.०७
अमेरिका : ३०

अॅम्बुलन्स न मिळाल्याने पुण्यात मनसेचे 'खळ्ळ-खट्याक'!​

लॉकडाउनच्या काळातील वाढलेली बेरोजगारी, मजुरांचे स्थलांतर, मानसिक विकार यामुळे मानसिक आरोग्याचा गांभीर्याने विचार केला जात आहे. समाजामध्येही जागरूकता वाढत चालली आहे.
- चतुर्वेदी, अधिकारी, नॅशनल इन्स्टट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)