अखेर खडकी - पारवडी रस्त्याची दुरुस्ती; 'सकाळ'च्या पाठपुव्याला यश

सावता नवले
Tuesday, 27 October 2020

मळद येथील निकृष्ट दर्जाचा तलाव 14 ऑक्टोबर रोजी फुटल्याने व पावसाच्या पाण्याने ओढयाला पूर आला होता. या पुरामुळे मळद, रावणगाव, नंदादेवी, खडकी, स्वामी चिंचोली येथील छोटे पूल, रस्ते वाहून गेले. त्यामध्ये खडकी - पारवडी  रस्त्याचा समावेश आहे.

कुरकुंभ(पुणे) : दौंड तालुक्यातील मळद येथील निकृष्ट दर्जाचा तलाव फुटल्याने ओढयाला पूर येऊन खडकी - पारवडी रस्ता वाहून गेलेल्या ठिकाणी ट्रॅक्टर उलटला. त्यामुळे तातडीने रस्ता दुरूस्ती करण्याचे वृत्त सकाळमध्ये प्रसिद्ध केल्यानंतर दखल घेऊन संबंधित विभागाने सोमवारी (  ता. 26 ) मुरूम टाकून रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मळद येथील निकृष्ट दर्जाचा तलाव 14 ऑक्टोबर रोजी फुटल्याने व पावसाच्या पाण्याने ओढयाला पूर आला होता. या पुरामुळे मळद, रावणगाव, नंदादेवी, खडकी, स्वामी चिंचोली येथील छोटे पूल, रस्ते वाहून गेले. त्यामध्ये खडकी - पारवडी  रस्त्याचा समावेश आहे. हा रस्ता वाहून गेलेल्या ठिकाणी 23 ऑक्टोबरला ऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर गाडीसह उलटला होता. या धोकादायक रस्त्याची तातडीने दुरूस्ती न झाल्यास मोठा अपघात संभवतो. यासंदर्भात 24 ऑक्टोबरला सकाळमध्ये छायाचित्रासह बातमी प्रसिद्ध झाली होती.

अकरावी ॲडमिशन: दीड महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया तत्काळ चालू करा; अभाविपचं आंदोलन

या बातमीची दखल घेऊन संबंधित विभागाने सोमवारी ( ता. 26 ) रस्ता वाहून गेलेल्या ठिकाणी मुरूम टाकून दुरूस्ती केली. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालक, ग्रामस्थ व प्रवाशांचा त्रास काहीसा कमी होणार आहे. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांमुळे दररोज येजा करणारे प्रवाशी, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या खड्डयांची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Khadki Parwadi road repair