शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज:दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांनाही दिलासा?

राजेंद्रकृष्ण कापसे
Saturday, 28 December 2019

राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकबाकीची रक्कम २ लाखापेक्षा जास्त असेल, अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत, असा उल्लेख करण्यात आला आहे. 

कर्वेनगर(पुणे) : दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना आम्ही कोणत्याही अटी न लावता, शेतकऱ्यांना हेलपाटे मारू न देता थेट कर्जमाफी दिली आहे. आमची कर्जमाफी सरळ आहे. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती जमा करीत आहे. योग्यवेळी त्यांनाही न्याय दिला जाईल,’ अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. ‘कर्जमाफीवरून आरोप करणाऱ्यांनी अटी घालून आणि शेतकऱ्यांना पन्नास वेळा हेलपाटे मारायला लावून कर्जमाफी दिली होती. ही आठवण देखील त्यांनी या निमित्ताने सांगितली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीत राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकबाकीची रक्कम २ लाखापेक्षा जास्त असेल, अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते. ‘ज्यांचे कर्ज दोन लाखांच्या आता आहे, ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा अधिक आहे आणि जे नियमित कर्ज भरणा करतात, अशा तिन्ही घटकांसाठी योजना राबवून त्यांचे अंशत: किंवा पूर्णत: समाधान करू,’ असेही ते म्हणाले.

चंद्रकांतदादा, तुम्ही मातोश्रीबाहेर कॅमेरे लावले होते का? : जयंत पाटील
 
‘सत्ता गेलेली असताना किमान माजी मुख्यमंत्र्यांनी तरी आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये,’ अशा शब्दांत त्यांनी नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीवरून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या व्यासपीठावरच झालेल्या चर्चेवर ‘बेरजेच्या राजकारणाला महत्त्व असते आणि राष्ट्रवादी त्याला प्राधान्य देईल,’ असे सूचक विधान पाटील यांनी केले.  

पुण्यातील कालवा समितीची बैठक असंवैधानिक : चंद्रकांत पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finance minister jayant patil said we will Give Direct loan waiver without any conditions