कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 20 लाखांची मदत

डॉ. संदेश शहा
Thursday, 1 October 2020

इंदापूर तालुक्यातील कोरोनामुळे मरण पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने २० लाख रुपयाचा चेक देण्यात आला. 

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कोरोनामुळे मरण पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने २० लाख रुपयाचा चेक देण्यात आला. संस्थेच्या मदतीमुळे दोन्ही कुटुंबाना आधार मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संतोष खुटाळे व सोपान कांबळे या दोन प्राथमिक शिक्षकांचा कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांच्या कुटूंबियांना आधार देण्यासाठी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने आपल्या शिक्षक सभासदांसाठी शिक्षक कल्याण निधीतून संतोष खुटाळे यांच्या पत्नी सविता व  सोपान कांबळे यांच्या पत्नी सुवर्णा यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा चेक दिला. 
आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास

शिक्षक पतसंस्थेचे सभापती सुनील वाघ, उपसभापती वसंत फलफले यांचे हस्ते त्यांना ही मदत करण्यात आली. यावेळी माजी सभापती किरण म्हेत्रे, संभाजी काळे, सुनील शिंदे, विलास शिंदे, दत्तात्रेय ठोंबरे, संचालक आदिनाथ धायगुडे, बालाजी कलवले, तज्ज्ञ संचालक सुनील चव्हाण, सचिव संजय लोहार, माजी तज्ज्ञ संचालक भारत ननवरे, शिक्षक समितीचे नेते मोहन भगत, प्रविण धाईंजे, प्रताप शिरसट, शिक्षक नेते सयाजी येवले, सदाशिव रणदिवे उपस्थित होते. 

यावेळी सभापती सुनील वाघ म्हणाले, ''इंदापूर शिक्षक सहकारी पतसंस्था सदैव शिक्षक सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते. संस्थेने सभासदांचा प्रत्येकी १० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला आहे. शिक्षक सभासदाचे कोणत्याही कारणाने निधन झाल्यास त्या शिक्षकांच्या कायदेशीर वारसास शिक्षक कल्याणनिधीतून १० लाखांची मदत तात्काळ व तत्परतेने दिली जाते.''

या मदतीमुळे शिक्षक कुटूंबास आर्थिक आधार मिळत असल्याने सभासदांमधून समाधान व्यक्त केले जाते. शिक्षक कल्याण निधीतुन शिक्षक सभासदांना विविध आजारासाठी तात्काळ ५० हजारांची देखील मदत दिली जाते. सन १९२५ साली स्थापना झालेल्या या संस्थेने राज्यातील आदर्श पतसंस्था असा नावलौकिक मिळवला आहे. स्वर्गीय सोपान कांबळे यांचे भाचे सयाजीराव येवले यांनी पतसंस्थेने दिलेल्या मदतीबद्दल खुटाळे व कांबळे कुटुंबाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करत पतसंस्था आधारवड असल्याचे म्हटले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: financial assistance from indapur taluka primary teachers credit union to the heirs of teachers who died due to corona