सामुहिक विवाह सोहळा आयोजकांना आर्थिक पाठबळ देणार -उपायुक्त दिलीप देशमुख

रमेश वत्रे
शुक्रवार, 6 जुलै 2018

केडगाव (पुणे) : राज्यातील शेतकरी कर्जाचा भार सहन न झाल्याने आत्महत्या करीत आहेत. मुलीच्या लग्नामुळे कर्जबाजारी होण्याचे प्रमुख कारण आहे. वडील कर्जबाजारी होऊ नये म्हणून लातूरमध्ये एका मुलीने आत्महत्या केली आहे. ही घटना ह्रदय द्रावक आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्त कार्यालय सामुदायिक विवाहांना प्रोत्साहन देत आहे. यासाठी तरूणांनी व सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. आम्ही त्यांना मदत करू असे आवाहन धर्मादाय उपायुक्त दिलीप देशमुख यांनी केले आहे. 

चौफुला (ता.दौंड, जि.पुणे) येथील बोरमलनाथ देवस्थानच्यावतीने वर्षातून अनेकदा सामुहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. नुकत्याच झालेल्या  सामुहिक विवाह सोहळ्याला देशमुख व धर्मादाय सहआयुक्त नवनाथ जगताप उपस्थित होते. यावेळी नऊ सामुदायिक विवाह लावण्यात आले. देवस्थानचे प्रमुख कैलास शेलार, रमेश शेलार, वरवंडचे सरपंच संतोष कचरे, अॅड. रोहिणी पवार, शुभांगी धायगुडे, सोनाली ताडगे यांनी सोहळ्याचे संयोजन केले. यावेळी देशमुख व जगताप यांनी काकासाहेब थोरात विद्यालयास सदिच्छा भेट दिली. कायम विनादानित विद्यालयातील सुविधा पाहून अधिका-यांनी समाधान व्यक्त केले.      

सह आय़ुक्त नवनाथ जगताप म्हणाले, धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सामुहिक विवाहाची संकल्पना मांडली. आणि या संकल्पनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामुहिक विवाह आयोजित करणा-या संस्थांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे मदतीसाठी अर्ज केल्यास त्यांना आर्थिक पाठबळ दिले जाईल. सामुहिक सोहळ्यांमुळे समाजाचा पैसा वाचेल. पैसा वाचला तर प्रगती होईल. आत्महत्या थांबतील. सर्वसामान्यांनी विवाहात कोणताही डामडौल न करता सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्याची गरज आहे. कैलास शेलार यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.  

Web Title: financial help to organizers of Community marriage said dilip deshmukh