‘सीएसआर’चे संस्थांना आर्थिक पाठबळ - राकेश बवेजा

कर्वेनगर - सीएसआर संमेलनाचे उद्‌घाटन करताना ओमप्रकाश पेठे सोबत मान्यवर.
कर्वेनगर - सीएसआर संमेलनाचे उद्‌घाटन करताना ओमप्रकाश पेठे सोबत मान्यवर.

वारजे माळवाडी - ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमुळे (सीएसआर) सामाजिक कार्याला प्रोत्साहनाबरोबर समाजाच्या विकासाचा स्तर उंचावण्यास मदत होते. सरकार करू शकत नाही, ती कामे करण्याची जबाबदारी या संस्थांची असते. त्यासाठी ‘सीएसआर’च्या माध्यमातून या संस्थांना आर्थिक पाठबळ मिळणे आवश्‍यक आहे,’’ असे मत फियाट इंडिया लिमिटेडचे उपाध्यक्ष (ऑपरेशन, सीएसआर) राकेश बवेजा यांनी व्यक्त केले.

लायन्स क्‍लब इंटरनॅशनल आणि कर्वे सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ७० सामाजिक संस्था, कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योग संस्थांचे एकत्रित ‘सीएसआर संमेलन’ आयोजित केले होते. बवेजा म्हणाले, ‘‘सीएसआरचा विनियोग करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातून वर्षाला दोन हजार पाचशे कोटी राज्यात खर्च केले जातात.’’

कर्वे सामाजिक सेवा संस्था येथे झालेल्या या संमेलनाला लायन्स क्‍लबचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उपप्रांतपाल अभय शास्त्री, हेमंत नाईक, कर्वे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. दीपक वलोकर, डॉ. महेश ठाकूर, परिषदेचे प्रमुख समन्वयक अनिल मंद्रुपकर, सहसमन्वयक किशोर मोहोळकर, तेजस्विनी सवाई, काशिनाथ येनपुरे उपस्थित होते. ‘सीएसआर’च्या प्रक्रियेबद्दल माहिती देणे आणि महत्त्वाचे म्हणजे भागीदारांमध्ये विश्‍वासवृद्धी व्हावी, यासाठी परिषद आयोजित केली होती. 

अनिल मंद्रुपकर यांनी संमेलनाचे उद्दिष्ट सांगितले. चयन पारधी यांनी ‘एनजीओ’च्या क्षमता बांधणीवर, तर पर्सिस्टंट्‌च्या योगिता आपटे यांनी एनजीओ निवडण्याची व अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली. कमिन्स इंडियाचे अमित लेले, सुदर्शन केमिकल्सच्या माधुरी सणस, फियाट इंडिया लि.चे प्रदीप पाटील, ओरलिकॉन ब्लेझर्स लि.च्या वेंदाती पाटील यांनी कंपनीद्वारे सीएसआरअंतर्गत केलेल्या कामासंबंधी माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com