esakal | संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली; आजपर्यंत जवळपास १८ लाख रुपये दंड वसूल

बोलून बातमी शोधा

ghole road
संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली; आजपर्यंत जवळपास १८ लाख रुपये दंड वसूल
sakal_logo
By
समाधान काटे

शिवाजीनगर : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र पुणे शहरात संचारबंदी च्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येते. जनवाडी येथील अरुण कदम चौकात भाजी, मटन, चिकन, स्टेशनरी, कपडे, वेल्डींग दुकाने बंदीच्या वेळेतही सुरू आहेत. आत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सकाळी ११ वाजता बंद करण्याचा आदेश असतांना देखील ही दुकाने सुरू ठेवली जातात.

दुकाने सुरूअसल्याने दिवसभर तरुण, महिला खरेदीच्या कारणामुळे बाहेर पडताना दिसत आहेत. शहरातील अनेक ठिकाणची दुकाने बंद असताना अरूण कदम चौकातील दुकाने उघडी कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: पुण्यात हवाईदलाकडून ऑक्सिजन वाहतूक

"दुकाने उघडी असतील तर महापालिका कर्मचारी व पोलिस कारवाई करतात.हॉटेल वगैरे सुरू असतील तर शासनाने दिलेल्या वेळेतच सुरू ठेवतात.दररोज नाकाबंदी असते, कारवाई करतो "

- समीर चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक, जनवाडी पोलिस चौकी.

" सोशल डिस्टन्स न पाळणे , मास्क न वापरणे या कारणासाठी घोलेरस्ता क्षेत्रीय कार्यालयच्या माध्यमातून सप्टेंबर २०२० ते आजतागायत ३५५७ केसेस (कारवाई) मध्ये १८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी कोरोनाला गांभिर्याने घ्यावे व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे"

- तुषार राऊत, आरोग्य निरीक्षक, घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा: पुण्यात लशींअभावी आज केंद्र बंद