esakal | पुण्यात हवाईदलाकडून ऑक्सिजन वाहतूक

बोलून बातमी शोधा

Oxygen transport from Air Force in Pune

पुण्यात हवाईदलाकडून ऑक्सिजन वाहतूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भारतात रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करताना देशातील एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत ऑक्सिजनचे टँकर पोचविण्यात वेळ लागत असल्यामुळे भारतीय हवाईदलाने पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने पुण्यासह देशातील विविध राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.

याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून ऑक्सिजनच्या रिकाम्या क्रायोजेनिक कंटेनरचा ताफा देशातील वेगवेगळ्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला पाठविण्यात येत आहे. तसेच तेथून भरलेले ऑक्सिजनचे कंटेनर पुन्हा त्या शहरांमध्ये पाठविले जात आहेत. यामुळे रुग्णालयांना वेगाने ऑक्सिजनचा पुरवठा होत असून वेळेत ऑक्सिजन मिळत असल्याने रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे.

हेही वाचा: करा दान; पण हवे भान! जास्त रक्त संकलित केल्यास वाया जाण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून हवाईदलाच्या मालवाहू विमानांच्या माध्यमातून देशातील विविध भागांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा व इतर सुविधा सामग्री पोचविण्याचे काम सुरू आहे. तर सोमवारी (ता. २६) हवाईदलाच्या सी १७ या मालवाहू विमानाने पुणे व भोपाळ येथून दोन तर जयपूर व इंदूर येथून तीन क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर एअरलिफ्ट करून जामनगर येथे आणले होते. तसेच बॅंकॉकहून चार रिकामे क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर एअरलिफट करून मंगळवारी (ता. २७) पहाटे पश्‍चिम बंगालच्या पानागढ एअरबेसवर पोचविण्यात आले.

कोरोनाच्या या कठीण काळात देशातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी हवाईदलातर्फे सातत्याने सेवा बजावण्यात येत आहे.

हेही वाचा: शाळांकडून मूल्यमापन आणि प्रात्यक्षिक परीक्षांची ‘सीबीएसई’ने मागविली माहिती