चोरीच्या वस्तू खरेदी करणाऱ्यांविरुद्धही गुन्हे दाखल होणार - सुवेझ हक

मिलिंद संगई
शनिवार, 12 मे 2018

बारामती (पुणे) : चोरीचे सोने असो वा मोटारसायकल, या पुढील काळात अनोळखी व्यक्तींकडून चोरीच्या वस्तूंची खरेदी करणाऱ्यांविरुद्धही जिल्हा पोलिस गुन्हे दाखल करतील असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिला. 

बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी नमूद केले की चोरी करणे हा जसा गुन्हा आहे तसाच चोरीचा माल घेणे हाही गुन्हा आहे. ओळखीच्या व्यक्तींकडून शहानिशा करुन नोंदी ठेवून माल घेतला असेल तर अशा वेळेस पोलिस कारवाई करणार नाही. मात्र कालांतराने चोरीचा माल कोणतीही शहानिशा न करता घेतला तर मात्र या पुढील काळात पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

अनेकदा चोरीच्या दुचाकी कागदपत्रे नंतर देतो या बोलीवर खरेदी केल्या जातात. नंतर त्या चोरीच्या आहेत असे निष्पन्न होते. या पुढील काळात दुचाकी खरेदी करताना त्याची पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाकडे माहिती घेऊन सगळी कागदपत्रे जवळ असल्याशिवाय गाडी खरेदी करु नये, असे आवाहनच सुवेझ हक यांनी केले आहे. जर कोणी व्यक्ती अशी गाडी विकायचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तींची माहिती तातडीने पोलिसांना कळवावी जेणेकरुन त्या बाबत शहानिशा करणे शक्य होईल, असे हक म्हणाले. 

Web Title: fir against those who purchase stolen goods said suvez haq