esakal | व्हॅलेंटाइनला गिफ्ट द्यायला तो तिच्या घरात घुसला अन्
sakal

बोलून बातमी शोधा

FIR Filed Against boy for misbehaving with girl and her family in pimpri

शुक्रवारी (ता. 14) रात्रीच्या सुमारास गिफ्ट देण्यासाठी आरोपी हा तरुणीच्या घरी गेला होता. "तू इथे का आला', असे विचारले असता त्याने गिफ्ट फिर्यादीच्या अंगावर फेकले. त्या वेळी फिर्यादीच्या आईने कोण आहे, असे विचारले असता आरोपी तेथून निघाला. त्या वेळी फिर्यादीची आई आरोपीवर ओरडल्याने तो त्यांच्यावर धावून गेला.

व्हॅलेंटाइनला गिफ्ट द्यायला तो तिच्या घरात घुसला अन्

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पिंपरी : 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त गिफ्ट देण्यासाठी तरुणीच्या घरी गेलेल्या तरुणाने तिच्याशी हुज्जत घातली. यासह तरुणीच्या आईला शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून गेला. याप्रकरणी तरुणीने पोलिसात धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दिल्याने चिखली पोलिस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
त्यानुसार परेश पाखले (रा. आकुर्डीगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता. 14) रात्रीच्या सुमारास गिफ्ट देण्यासाठी आरोपी हा तरुणीच्या घरी गेला होता. "तू इथे का आला', असे विचारले असता त्याने गिफ्ट फिर्यादीच्या अंगावर फेकले. त्या वेळी फिर्यादीच्या आईने कोण आहे, असे विचारले असता आरोपी तेथून निघाला. त्या वेळी फिर्यादीची आई आरोपीवर ओरडल्याने तो त्यांच्यावर धावून गेला.

कॉसमॉस बॅंक सायबर हल्यातील 'एवढी' रक्कम वसूल; पुणे पोलिसांना यश

परिसरातील लोकांनी त्याला इमारतीच्या बाहेर काढले. दरम्यान, आरोपी दोन महिन्यांपासून फिर्यादीच्या मैत्रिणीकडे त्यांचा मोबाईल नंबर मागत असून पाठलागही करत होता.