कॉसमॉस बॅंक सायबर हल्यातील 'एवढी' रक्कम वसूल; पुणे पोलिसांना यश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

कॉसमॉस बॅंकेच्या गणेशखिंड येथील मुख्यालयातील एटीएम स्वीचवर (सर्व्हर) ऑगस्ट 2018 या काळात सायबर गुन्हेगारांनी मालवेअर हल्ला चढविला होता. त्याद्वारे त्यांनी 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम लुटली होती. त्यापैकी बहुतांश पैसे तब्बल 26 देशांमधून काढण्यात आले होते. तर हॉंगकॉंगमधील हेनसेंग बॅंकेत 13 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्यात आली होती. 

पुणे : कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्वीचवर (सर्व्हर) सायबर हल्ला चढवून चढवून सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेल्या तब्बल 94 कोटी 42 लाख रुपयांपैकी 5 कोटी 73 लाख रुपये परत मिळविण्यात पुणे सायबर पोलिसांना यश आले आहे. सायबर हल्लात गेलेली रककम परदेशातुन पुन्हा मिळविण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचा दावा पोलिसांनी केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कॉसमॉस बॅंकेच्या गणेशखिंड येथील मुख्यालयातील एटीएम स्वीचवर (सर्व्हर) ऑगस्ट 2018 या काळात सायबर गुन्हेगारांनी मालवेअर हल्ला चढविला होता. त्याद्वारे त्यांनी 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम लुटली होती. त्यापैकी बहुतांश पैसे तब्बल 26 देशांमधून काढण्यात आले होते. तर हॉंगकॉंगमधील हेनसेंग बॅंकेत 13 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्यात आली होती. 

स्थायी समितीत आता महिलाराज; 'यांना' मिळाली संधी

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह व त्यानंतर पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषत तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. या पथकामध्ये सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी व सायबर तज्ज्ञांचा समावेश होता. या घटनेनंतर सायबर पोलिसांनी कोल्हापुर, मुंबई, पुणे व इंदौर या शहरांमधून पैसे काढलेल्यांना अटक केली होती. 

अन् पीएमपीएल बसमध्ये चोरी करणाऱ्यास प्रवाशांनीच पकडले

एकीकडे आरोपी अटक करीत असतानाच दुसरीकडे बॅंकांमध्ये असलेली कोट्यावधी रुपयांची रक्कम आणण्यासाठीही पोलिसांकडून पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार हॉंगकॉंगमधील हेनसेंग बॅंकेमध्ये ए.एल.एम ट्रेडिंग लिमिटेड या खात्यावर 13 कोटी 92 लाख रुपये वर्ग करण्यात आले होते. रक्कम परत मिळावी, यासाठी सायबर पोलिसांनी हॉंगकॉंगची हेनसेंग बॅंक, न्यायालय व तेथील सरकारशी तत्काळ पत्रव्यवहार केला. त्यानंतर पोलिसांनी 10 कोटी रुपये गोठविण्यात आले होते. ही रक्कम परत मिळावी, यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरु होते.  दरम्यान हॉंगकॉंगमधील न्यायालयात सोमवारी सकाळी ही प्रक्रिया पार पडली. त्यानंतर स कॉसमॉस बँकेमध्ये 5 कोटी 73 लाख रुपये पैसे जमा झाले.

मेट्रोच्या ट्रॅफिक वॉर्डनचा ट्रकच्या धडकेने मृत्यू 

18 आरोपी अटकेत, 'मास्टरमाईंड' निसटला

कॉसमॉस प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी मुंबई, औरंगाबाद, नांदेड, ओरीसा,ठाणे येथून 18 जणांना अटक केली होती. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपीचा पोलिसांनी नेपाळपर्यंत पाठलाग केला. मात्र त्यास पोलिस आल्याचा सुगावा लागल्यानंतर त्याने तेथून पलायन केले होते.

पुणे रेल्वे स्टेशनवरून कोणत्या गाड्या केल्या रद्द? का? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune police succeeded in recovering Rs 5 crore 73 lakhs Cosmos Bank cyber attack