लाल महाल लावणी प्रकरण: लाल महाल लावणी प्रकरण: आव्हाडांचं एक ट्वीट आणि तिघांविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad News

लाल महाल लावणी प्रकरण: आव्हाडांचं एक ट्वीट आणि तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील लाल महालात तमाशातील गाण्यावर नृत्य आयोजन केल्याचं समोर आलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लाल महालाची बदनाम केली जात असल्याच्या प्रतिक्रिया आल्या. ही बदनामी करणाऱ्यांवर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर यांनी केली आहे. त्यानंतर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत ट्वीट केलं. (Jitendra Awhad News)

आता या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लाल महालात लावणी करणाऱ्या वैष्णवी पाटीलसह तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झालीय. रखवालदार राकेश विनोद सोनवणे यांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर फरासखाना पोलिसांनी कारवाई केली आहे.

रिल्स करण्याच्या नादात लावणीवर नाचगाणी सुरू असल्याचा आरोप पासलकर यांनी केला होता. यानंतर महाविकास आघाडीतील पहिल्या मंत्र्यांने म्हणजेच जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं. अखेर पोलिसांनी तत्का गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या मुलाचा स्क्रिनशॉट आव्हाडांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.

याचसोबत त्यांनी केतकी चितळेबद्दलही नाराजी व्यक्त केली होती. आजही आव्हाडांनी ट्वीट केल्यानंतर पुणे पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याचं समोर आलंय.

हेही वाचा: तमाशातील गाण्यांवर नृत्याचे आयोजन; लाल महालाची बदनामी; विकास पासलकर

हेही वाचा: 'कोणी केलं असेल तर...', लाल महालातील लावणीवरून आव्हाड संतापले

या व्हिडिओसंदर्भात तीन दिवसांर्वी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे संभाजी ब्रिगेडच्यावतीने तक्रार करण्यात आलेली आहे.

या घटनेच्या पाठीमागे खूप मोठे षडयंत्र आहे. हे षडयंत्र रचणारे व त्यांना साथ देणारे कोण आहेत, याचा शोध घेतला पाहिजे. या घटनेचा शुक्रवारी (ता.२०) लाल महालात जाऊन निषेध करण्यात आला. यावेळी जिजाऊ व शिवरायांना पुष्पहार अर्पण करून निषेध नोंदवण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडने दिली.

अखेर माफीनामा

हे प्रकरण चिघळू लागल्यानंतर वैष्णवी पाटीलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे.

Web Title: Fir Filed Against Four After Dancing In Lal Mahal Of Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :jitendra awhad