अनैतिक व्यवसाय करणाऱ्या लॉज मालकाविरुद्ध गुन्हा

दत्ता म्हसकर
बुधवार, 4 एप्रिल 2018

जुन्नर - अनैतिक शारीरिक व्यापार करून घेणाऱ्या लॉज चालक, व्यवस्थापक व मालकाविरुद्ध नारायणगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे नाशिक महामार्गावरील मौजे कांदळी गावचे हद्दीतील टोटो कंपनी फाटा येथील  हॉटेल महाराजा योगीराज वर रात्रौ ८:४० मिनिटांनी ही  कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिमा यशवंत लोंढे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ही कारवाी करण्यात आली आहे. कृष्णा सुरेश फरपट लॉज चालक(30) अजय रुपलाल राजने लॉज व्यवस्थापक आणि शेषमल हारकू लांडगे लॉज मालक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

दि २ रोजी आळेफाटा परिसरात वेश्या व्यवसाय करण्यासाठी काही मुलींना व महिलांना आणण्यात आले. याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार आळेफाटा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, जुन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास घोडके व सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलिस कर्मचारी वर्गास घेऊन आळेफाटा व परिसरातील सर्व लॉजची तपासणी केली. दरम्यान खात्रीशीर मिळालेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक महामार्गावर कांदळी गावच्या हद्दीतील हॉटेल महाराजा येछे वेश्या व्यवसायासाठी या मुली व महिला आणण्यात आलो. सदर लॉजची तपासणी केली असता मुंबई, पुणे व कोलकत्ता येथील एकूण ९ पीडित मुली आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी लॉज चालक व व्यवस्थापक यांना अटक करून त्यांच्यावर भा.द. वि.क ३७०(२), ३४२,३६६, ३७३- स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६चे कलम ३, ४ ,५,६,७. नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.

Web Title: FIR has been lodged against the hotel manager and owner