फसवणूक केल्याप्रकरणी दोघींविरोधात गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

हडपसर - एकच जमीन अनेकांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. 

सुंदराबाई महादू बाठे व पुष्पा काळूराम साकोरे (दोघी रा. फुरसुंगी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत सतीश भानुदास शेळके (रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिस निरीक्षक विश्‍वजित खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाठे व साकोरे यांनी शेळके यांना 2004 मध्ये 16 लाखांमध्ये जमीन विकली होती. त्यावेळी 14 लाख देऊन साठेखत केले होते. बाकीची रक्कम खरेदीखत करतेवेळी देऊन व्यवहार पूर्ण करावयाचा होता. मात्र, नंतर बाठे व साकोरे यांनी खरेदीखत करण्याबाबत टाळाटाळ केली. बाठे व साकोरे यांनी परस्पर तिसऱ्या ग्राहकाला जमीन विकली. हे लक्षात आल्यावर शेळके यांनी पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी 14 लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शेळके यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: FIR has been lodged against them for cheating