बोअरवेल बंदिस्त न केल्याने एकावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

अनेक ठिकाणी बोअरवेल उघडे

आंबेगाव तालुक्यात पाणी न लागल्यामुळे अनेक ठिकाणी बोअरवेल उघडे आहेत. संबधितांनी ताबडतोब बोअरवेल बंदिस्त करावेत. अन्यथा संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक कृष्णा खराडे यांनी दिला.

मंचर : जाधववाडी- रांजणी (ता.आंबेगाव) येथे रवी पंडीत भिल (वय-6) हा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला. त्याला किरकोळ दुखापत झाली. या बोअरवेलचे तोंड बंदिस्त केले नव्हते. याप्रकरणी मंचर पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवणारे बोअरवेलचे मालक अविनाश नामदेव जाधव (रा. जाधववाडी, ता. आंबेगाव) यांच्या विरोधात गुरुवारी (ता.21) रात्री गुन्हा दाखल केला आहे.

थोरंदळे ते जाधववाडी रस्त्यालगत गट क्रमांक 282-2 मध्ये जाधव यांचा 200 फूट खोल व सहा फूट व्यासाचा बोअरवेल आहे. बोअरवेलला पाणी न लागल्यामुळे त्यांनी फक्त बोअरवेलवर पोते व दगड ठेवला होता. बोअरवेल पूर्णपणे बंदिस्त करणे गरजेचे होते. मात्र, बोअरवेल बंदिस्त न केल्याने सदर दुर्घटना घडली. याप्रकरणी रवीचे वडील पंडित भिल यांनी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सागर गायकवाड यांनी रितसर पंचनामा करून पुढील तपास सुरु केला आहे.

अनेक ठिकाणी बोअरवेल उघडे

आंबेगाव तालुक्यात पाणी न लागल्यामुळे अनेक ठिकाणी बोअरवेल उघडे आहेत. संबधितांनी ताबडतोब बोअरवेल बंदिस्त करावेत. अन्यथा संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक कृष्णा खराडे यांनी दिला.

Web Title: FIR has been registered against who opened borewell