Pune Fire Accident : शॉर्टसर्किट मुळे उसाला आग: तेरा लाख रुपयांचे नुकसान

तीन शेतकऱ्यांचे सुमारे तेरा लाख रुपयांचे नुकसान
fire accident in narayangaon Sugarcane fire due to short circuit loss of Rs 13 lakh pune
fire accident in narayangaon Sugarcane fire due to short circuit loss of Rs 13 lakh punesakal

नारायणगाव : येथील खडकवाडी(ता.जुन्नर) शिवारात वीज वाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट मुळे पडलेल्या ठिणग्यामुळे आग लागून दहा एकर क्षेत्रातील काढणीस तयार झालेल्या उसाचे उभे पीक व द्राक्षाच्या सुमारे तीनशे वेली जळून तीन शेतकऱ्यांचे सुमारे तेरा लाख रुपयांचे नुकसान झाले.

ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाली. अशी माहिती शेतकरी दादाभाऊ खैरे, तानाजी भाऊ खैरे यांनी दिली. खडकवाडी(ता.जुन्नर) शिवारात मीना शाखा कालव्याच्या जवळ लिंबाजी मारुती शेटे ,तानाजी भाऊ खैरे यांची उसाची शेती आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेतातून गेलेले वीज वाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट झाले. या मुळे ऊस पेटला.

दीड तासात लिंबाजी शेटे व तानाजी खैरे यांचा दहा एकर क्षेत्रातील उसाचे उभे पीक व ड्रीपच्या नळ्या जळून खाक झाले. शेटे व खैरे यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. उसाच्या शेता लगत आबाजी कतोरे यांची द्राक्ष बाग आहे.

बागेतील सुमारे तीनशे वेलींना आगीच्या झळया लागल्याने कतोरे यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.या बाबतची माहिती दादाभाऊ खैरे यांनी गावकामगार तलाठी व वीज कंपनीचे अधिकारी यांना दिली.

या भागात शॉर्टसर्किट मुळे आग लागण्याची वर्षभरातील तिसरी घटना आहे. वीज वाहक तारा जीर्ण झाल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशी माहिती खैरे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com