आग विझविण्यासाठी अर्ध पुणं फिरलेली गाडी  (व्हिडिओ)

आग विझविण्यासाठी अर्ध पुणं फिरलेली गाडी  (व्हिडिओ)

पुणे - विंटाज गाडी? तीही आग विझविण्यासाठी वापरली गेलेली? एकोणीसशे छप्पनपासून बरीच वर्षे सेवा देत राहिलेली ही गाडी आग विझविण्यासाठी अर्ध पुणं फिरलेली आहे आणि आजही रस्त्यावर छान धावते, हे ऐकून आश्‍चर्य वाटतं. ही गाडी मिरवणारं हे वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय. 

आग विझविण्यासाठी उपाययोजनेतील उत्क्रांती व प्रगती कशी झाली हे जाणून घेण्यासाठी या संग्रहालयाला भेट द्यायला हवी. एखाद्या ठिकाणी मोठी आग लागली, की ती विझविण्यासाठी अग्निशमन दल भरपूर पाणी घेऊन तिथं पोचतं. आग आटोक्‍यात आणली जाते. जीव धोक्‍यात घालून ही मंडळी काम करतात. 

एरंडवण्यात राजा मंत्री उद्यानाला लागूनच अग्निशमन विभागाचं एक केंद्र आहे. या ठिकाणी देशातील पहिलं अग्निशमन संग्रहालय आहे, हे इथले कर्मचारी अभिमानाने सांगतात. आग विझविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे निरनिराळे प्रकार इथं ठेवलेले आहेत. वाहनं, पाइप, कटर, शिड्या, अग्निप्रतिबंधक वेश, हॉर्न, घंटा आदींची रंजक माहिती इथं मिळते. आग लागलीच तर नागरिकांनी काय करावं, कोणती काळजी घ्यावी, आग लागूच नये म्हणून काय खबरदारी घ्यावी वगैरे माहिती सविस्तरपणे या संग्रहालयाच्या विविध दालनांमध्ये मिळते. 

या केंद्रातील अग्निशमन अधिकारी राजेश जगताप म्हणाले, ""आमच्याकडे वर्षभरात सुमारे 40 शाळांमधील विद्यार्थी येतात. त्यांना आम्ही संग्रहालयाच्या माध्यमातून माहिती देतो. आगीपासून बचाव व ती लागूच नये यासंबंधी खबरदारी घेण्याबाबत आम्ही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवत छोटंसं प्रशिक्षण देतो. अग्निशमन दलासारख्या महत्त्वाच्या सेवेत येण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या मुलांना यासाठी काय करायला हवं त्याची सविस्तर माहिती देतो.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com