पुण्यातील प्लॅस्टिकचे कप बनविणाऱ्या कंपनीत शॉर्टसर्कीटमुळे आग 

Fire caused by a short circuit at Godown of plastic cup in pune.jpg
Fire caused by a short circuit at Godown of plastic cup in pune.jpg

पुणे : प्लॅस्टिकचे कप बनविणाऱ्या कंपनीमध्ये आग लागून सात ते आठ पत्र्यांच्या शेडचे नुकसान झाले. याबरोबरच एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना सोमवारी सकाळी पावणे दहा वाजता नांदेडगाव येथील कोरडेबाग परिसरामध्ये घडली. पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. 

नांदेडगाव येथील कोरडेबाग परिसरामध्ये प्लॅस्टिकचे कप बनविणारी एक कंपनी आहे. या कंपनीस सोमवारी सकाळी दहा वाजता आग लागल्याची खबर पीएमआरडीएच्या अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतलर अग्निशामक दलाच्या गाड्या व बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच आग मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे प्लॅस्टिकचे कप बनविणाऱ्या कंपनीसह त्याभोवतीच्या सात ते आठ पत्र्याचे शेड जळून खाक झाले होते. याबरोबरच दुकानापासून जवळच असलेले एका भंगार व्यावसायिकाचे दुकानही जळून गेले.

अग्निशामक दलाच्या जवानांनी दिड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र अधिकारी सुजित पाटील, ओंकार इंगवले, अतुल रोकडे, प्रसाद जीवडे, अभिजित गोणे, सुरज शिंदे, सचिन गवळी, चेतन खमसे, महेश पाटील, प्रशांत चव्हाण, श्रीकांत अढाऊ , किशोर काळभोर, ज्ञानेश्वर बुधवंत, पंकज माळी यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com