पुणे-सोलापूर महामार्गावर केमिकलच्या ट्रकला आग

जनार्दन दांडगे
बुधवार, 4 जुलै 2018

लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाक्यावर केमिकलने भरलेला ट्रक रस्ता दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. बुधवारी (ता. 04) पहाटे पावणेचार वाजता झालेल्या या अपघातामध्ये ट्रकचालक रामदास धोंडीबा सोनवणे (वय - 25, रा. वरवंड, ता. दौंड) हा किरकोळ भाजला असून ट्रकसह दोन मोटारी, टोलनाक्याचे पत्राशेड व एका टायर दुकानाचे किरकोळ नुकसान झाले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास सोनवणे हा कुरकुंभ (ता. दौंड) येथील कंपनीतून केमिकलने भरलेले बॅरल घेवून मुंबईकडे निघाला होता. दरम्यान बुधवारी पहाटे कवडीपाट टोलनाका येथे एका मोटार चालकाने गाडी आडवी मारल्याने बॅरल भरलेला ट्रक टोलनाक्यावरील रस्ता दुभाजकाला धडकला, याचवेळी ट्रकने पेट घेतला. अचानक पेटलेल्या ट्रकमुळे टोलनाक्यावरील कामगार व इतर सर्वांची धावपळ सुरु झाली. आग लागल्याची माहिती स्थानिकांनी हडपसर, कोंढवा व भवानी पेठ मुख्य अग्निशामक केंद्राला कळविली. त्यानुसार अग्निशामक दलाच्या 20 जवानांनी सुमारे दीड तासांच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली. दोन अग्निशामक बंब व एका टँकरच्या मदतीने ही आग आटोक्यात आली. दरम्यान अधूनमधून होणाऱ्या केमिकलच्या स्फोटांमुळे आगीचे लोट बाहेर पडत असल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती.

दरम्यान अपघाताच्या वेळी लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले, गणेश पिंगुवाले व त्यांचे सहकारी, टोलनाका कर्मचारी व स्थानिक रहिवासी राकेश लोंढे यांनी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सहकार्य केले. अग्निशामक दलाच्या जवानांमध्ये फायर स्टेशन ऑफिसर शिवाजी चव्हाण, अनिल गायकवाड, चंद्रकांत वाघ, तांडेल तानाजी गायकवाड, फायरमन कैलास टकले, सचिन आव्हाळे यांच्या पथकामध्ये समावेश होता. 

Web Title: fire to chemical truck on pune solapur highway