विद्यार्थ्यांकडून फटाकेमुक्त दिवाळीची शपथ

hadapsar
hadapsar

हडपसर : विद्यार्थी आणि फटाके हे आनंद साजरे करणारं नात. पण फटक्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी या नात्याचा त्याग करून फटाके विरहीत पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. तसेच त्यांनी रॅलीद्वारे जनजागृती केली. बच्चेकंपनी असतानाही या विद्यार्थ्यांनी फटाकेबाजीचा विरोध करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे हडपसरमध्ये कौतुक केले जात आहे. 

या कार्यक्रमाचे आयोजन शिवसमर्थ संस्थेच्यावतीने करण्यात आले होते. शिवसमर्थ संस्थेच्या अध्यक्षा मनीषा वाघमारे यांनी विद्यार्थ्यांनी दिवाळीत वायूप्रदूषण व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी 'फटाके विरहित प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प' विद्यार्थ्यांच्या बैठकीत मांडला. या नावीन्यपूर्ण उपक्रमाला विदयार्थी व पालक या सर्वांनी दाद दिली आणि विद्यार्थ्यांनी दिवाळीत आईवडिलांकडे फटाक्यांचा आग्रह धरायचा नाही, फटाकेच विकत घ्यायचे नाहीत, फटाके फोडायचेच नाही असा निर्धार घेतलेल्या शपथेतून घेतला. फटाक्यातून जे रुपये खर्च होणार होते, त्या वाचलेल्या रुपयातून पुस्तके विकत घेणे, किल्ले तयार करणे, निरनिराळे छंद जोपासणे, पर्यटन करणे, अनाथ आश्रमास भेट देण्याच्या पर्यायाला प्राधान्य देण्यात आले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना फटाके मुक्त व सुरक्षित दिवाळीची शपथ दिली. डॉ.शांतनू जगदाळे यांनी आयुर्वेद दिवाळी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी संस्थेच्या सचिव आरती जगताप, सुनंदा खोमणे, संगीता गायकवाड, वृषाली यादव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com