esakal | शिरूर : शिरसगाव काटा येथील शेतमजूरांच्या झोपड्या आगीत खाक
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूर : शिरसगाव काटा येथील शेतमजूरांच्या झोपड्या आगीत खाक

आगीत शेतमजुरांच्या चार झोपड्या जळून खाक झाल्या असून यात शेतमजुरांचे संसार उघड्यावर आले आहेत.

शिरूर : शिरसगाव काटा येथील शेतमजूरांच्या झोपड्या आगीत खाक

sakal_logo
By
Team eSakal

मांडवगण फराटा : शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे अचानक लागलेल्या आगीत शेतमजुरांच्या चार झोपड्या जळून खाक झाल्या असून यात शेतमजुरांचे संसार उघड्यावर आले आहेत.

हेही वाचा - पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!

याबाबत कामगार तलाठी योगेश टिळेकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, शिरसगाव काटा येथील मानेमळा येथे काही शेतमजूरांची घरे असून ती रोजंदारी व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. २ एप्रिल रोजी दुपारी अचानक आग लागून यातील चार कुटुंबाच्या छप्पराच्या घरास आग लागून घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य, भांडी, कपडे जळून खाक झाली. या आगीत मोहन बरडे,रामदास जाधव,चंदा शिंदे, सुलभा माळी या शेतमजूरांच्या झोपड्या जळून खाक झाल्या असून सर्वांचे मिळून एक लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती टिळेकर यांनी दिली.

दरम्यान, घटनेची माहिती कळताच गावचे सामजिक कार्यकर्ते नरेंद्र माने,सतीश चव्हाण, सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी भेट देत कुटुंबाची चौकशी केली आहे. तर शिरूर येथील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली चव्हाण यांनी या कुटुंबांना तातडीने मदत व्हावी यासाठी पुढाकार घेतला असून, समाजातील दानशूर व्यक्तींनी या कुटुंबांना सावरण्यासाठी मदत देत पुढे यावे असे आवाहन वैशाली चव्हाण यांनी केले आहे.

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image