पुण्यात खाद्यपदार्थांच्या दुकानांना आग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

पुणे : नारायण पेठेतील काही खाद्यपदार्थांच्या दुकानांना आग लागण्याचा प्रकार रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तीन तासात आग आटोक्‍यात आणली. या आगीमध्ये तीन दुकाने जळून खाक झाली. नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकामध्ये खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. संबंधीत दुकानांमधून रविवारी सकाळी सात वाजता धूर येत असल्याचे एका नागरिकाच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत अग्निशामक दलाला खबर दिली.

दरम्यान कसबा पेठ अग्निशामक केंद्रातील बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तत्पुर्वी खाद्यपदार्थांच्या दुकानातील एक सिलेंडर फुटल्याने आग वाढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर जवानांनी दुकानातील दोन सिलेंडर बाहेर काढले. एका थंड पेयाच्या दुकानासह त्याच्या शेजारी असणारी आणखी दोन दुकाने आगीमध्ये जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वीस मिनीटांमध्ये आग आटोक्‍यात आणली. दलाचे जवान संजय गायकवाड, गणेश लोणारी, जितेंद्र सपाटे यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले. पंधरा ते वीस मिनिटांत आग नियंत्रणाखाली आणली

Web Title: Fire at food shops in Pune