esakal | थेऊरफाटयावर इंधनवाहू टँकरला अचानक आग; हजारो लीटर पेट्रोल-डिझेल जळून खाक

बोलून बातमी शोधा

Sudden fire to fuel tanker at Theur phata Burn thousands of liters of petrol-diesel }

दरम्यान टँकरमध्ये डिझेल व पेट्रोल असल्याने, आगीचे लोळ काही क्षणातच जमिनीपासून शंभर फुटाहून अधिक उंचीवर गेले. अचानक आगीचे लोट दिसू लागल्याने, थेऊरफाटा व आसपासच्या 10 किलोमीटर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.

थेऊरफाटयावर इंधनवाहू टँकरला अचानक आग; हजारो लीटर पेट्रोल-डिझेल जळून खाक
sakal_logo
By
जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे)- कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथे पार्किंगमधील इंधनवाहू टँकरला अचानक आग लागली.  यामध्ये टँकरमधील नऊ हजार लिटर डिझेल व दहा हजार लिटर पेट्रोल जळून खाक झाले आहे. ही घटना मंगळवारी (ता. २) रात्री अकरा वाजता  घडली आहे. श्रीकांत राजेंद्र सुंबे हे टँकर मालकाचे नाव असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे लोणी काळभोर पोलिसांकडे दाखल केलेल्या नमुद करण्यात आले आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत सुंबे यांचा इंधन वाहतुकीचा व्यवसाय असून,त्यांच्या मालकीचे दहाहून अधिक टँकर रात्रीच्यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊरफाटा येथे उभे केले जातात. मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास सुंबे यांच्या मालकीचा टँकर (MH12 MX 7116) हा भारत पेट्रोलियम कंपनीतून डिझेल 9000 लिटर व पेट्रोल 10000 लिटर भरुन बाहेर पडला. हे इंधन महाबळेश्वर येथील इराणी पेट्रोल पंपावर नेण्यात येणार होते. मात्र रात्रीचे वेळ असल्याने, सुंबे यांनी वरील टँकर थेऊरफाटा येथे उभा केला होता. दरम्यान रात्री अकरा वाजता सुमारास टँकरला अचानक आग लागली. टँकरमध्ये पेट्रोल व डिझेल ही ज्वलनशील प्रदार्थ असल्याने, आगीने अगदी अल्पवेळात रोद्र रुप धारण केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान टँकरला आग लागल्याचे लक्षात येताच, पार्कींगजवळ झोपलेल्या टँकर चालकांना व स्थानिक नागरिकांनी आग शमविण्याचे प्रयत्न सुरु केले.  काही नागरिकांनी टँकरजवळ उभी केलेली वाहने हलविण्यास सुरुवात केली. लोणी काळभोर पोलिसांना ही बाब समजताच, अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र अग्निशामक दल पोचण्यापुर्वीच टँकर जळून खाक झाला होता. 

थेऊरफाटा व आसपासच्या  परिसरात भितीचे वातावरण.. 

दरम्यान टँकरमध्ये डिझेल व पेट्रोल असल्याने, आगीचे लोळ काही क्षणातच जमिनीपासून शंभर फुटाहून अधिक उंचीवर गेले. अचानक आगीचे लोट दिसू लागल्याने, थेऊरफाटा व आसपासच्या 10 किलोमीटर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पेटलेल्या टँकरजवळ उभे असलेले आनखी दोन डिझेल व पेट्रोलने भरलेले टँकर सुंबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हलविल्याने पुढील अनर्थ टळला. हा सर्व प्रकार एक तासाहून अधिक काळ सुरु होता. लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने उपाय योजना करुन पुढील अनर्थ टाळला. 

जेईई मेन्स दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्यास सुरवात

आग नेमकी शॉर्टसर्किटमुळे की अन्य कारणामुळे...
श्रीकांत सुंबे यांच्या इंधनवाहू टँकरला लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे तक्रारीत नमुद केले असले तरीरी, आगीचे नेमके कारण वेगळेत असल्याची चर्चा सुरु होती. कदमवाकवस्ती व थेऊरफाटा परिसरात रात्रीच्या वेळी इंधनवाहू टँकरमधून डिझेल व पेट्रोलची चोरी मोठ्या प्रमाणात केली जाते. सुंबे यांच्या टँकरमधुन पेट्रोलची चोरी होत असतानाच, वरील प्रकार घडल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. या प्रकरणाची तटस्थ चौकशी झाल्यास, वरील प्रकरणातील सत्य बाहेर येऊ शकते.

...तर जिमची ‘हेल्थ’ पुन्हा बिघडेल