esakal | जेईई मेन्स दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्यास सुरवात

बोलून बातमी शोधा

JEE-Exam}

जेईई मेन्सची पहिल्या टप्प्यातील परीक्षा झाल्यानंतर त्याची प्रश्‍नपत्रिका, उत्तर सूची आणि दिलेली उत्तरे याची माहिती आॅनलाइन जाहीर केली आहे. तसेच मार्च महिन्यातील दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी ६ मार्च पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आयआटी व इतर राष्ट्रीय स्तरावरील इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट अभ्यासक्रमांना २०२१ मध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) यंदा चार टप्प्यात जेईई मेन्सची परीक्षा घेतली जाणार आहे.

जेईई मेन्स दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्यास सुरवात
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जेईई मेन्सची पहिल्या टप्प्यातील परीक्षा झाल्यानंतर त्याची प्रश्‍नपत्रिका, उत्तर सूची आणि दिलेली उत्तरे याची माहिती आॅनलाइन जाहीर केली आहे. तसेच मार्च महिन्यातील दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी ६ मार्च पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आयआटी व इतर राष्ट्रीय स्तरावरील इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट अभ्यासक्रमांना २०२१ मध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) यंदा चार टप्प्यात जेईई मेन्सची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना चारीही परीक्षा देता येणार आहेत. त्याचा पहिला टप्पा २३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत झाला आहे. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील परिक्षेसाठी अर्ज भरून घेण्यासाठी एनटीएने सुरवात करून घेतली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एलन करिअर इन्स्टिट्यूटचे पुणे शाखेचे प्रमुख अरुण जैन म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना एकाच वेळी चारीही परीक्षांसाठी नोंदणी करणे शक्य होते. ज्यांनी पूर्वी नोंदणी केली आहे त्यांना परीक्षा केंद्र, स्वतःची माहिती, शैक्षणिक माहिती यात बदल करू शकणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत अर्जच भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांना मार्च, एप्रिल व मे या तिन्ही टप्प्यांसाठी अर्ज करता येणार आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आणखी एक खटला दाखल; ५ मार्चच्या निकालाकडे लक्ष

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील परिक्षेची उत्तर सूची व विद्यार्थ्यांनी सोडविलेले उत्तर ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. त्यात सोडविलेले उत्तर पडताळून पाहता येणार आहे. त्यामध्ये हरकत असेल तर ती नोंदविण्यासाठी ३ मार्च सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे, असे जैन यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil