वाघोलीतील इमारतीच्या कचरा टाकण्याच्या टाकीस आग

वाघोलीतील इमारतीच्या कचरा टाकण्याच्या टाकीस आग

पुणे : इमारतीमधील कचरा टाकण्याच्या फायबरच्या टाकीसह डक्‍टला आग लागल्याची घटना रविवारी सकाळी पावणे सात वाजता वाघोली येथे घडली. दरम्यान पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु, त्यापुर्वीच आग विझली.

वाघोली येथील मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळच चव्हाण सोसायटी आहे. संबंधीत सोसायटीमध्ये आग लागल्याची खबर तेथील रहीवाशाने रविवारी सकाळी पावणे सात वाजता 'पीएमआरडीए'च्या अग्निशामक दलास मिळाली. दरम्यान, संबंधीत सोसायटीचा परिसर महापालिकेच्या हद्दीबाहेर आणि 'पीएमआरडीए'च्या अंतर्गत येत असल्याने 'पीएमआरडीए'च्या अग्निशामक दलाच्या नांदेड सिटी व हिंजवडी येथील गाड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या. गाड्या पोचण्यासाठी एक ते पाऊणतास लागला. तत्पुर्वी आग विझविण्यात आली होती.

आगीमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेली नाही. मात्र, धुर आल्यामुळे नागरीकांमध्ये घबराट पसरली होती. 'पीएमआरडीए'च्या अग्निशामक दलाचे फायर ऑफीसर विजय महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ मजली सोसायटीतील प्रत्येक मजल्यावरील कचरा पाईपद्वारे फायबरच्या टाकीमध्ये टाकला जातो. याच फायबर टाकीतील कचऱ्यास आग लागली. नंतर आगीमुळे संपुर्ण टाकी जळली, याबरोबरच प्रत्येक मजल्यावरील कचरा टाकण्याची पाईपलाईनही जळून खाक झाली. टाकीच्या आसपास वीजेच्या तारा नव्हत्या, त्यामुळे ही आग उष्णता किंवा सिगारेटमुळे लागली असण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com