पुणे: सिलेंडर गळतीने माणिकबाग येथील साई प्रेमाचा चहा या दुकानास आग

तात्पुरती आग विझली, आणि लगेचच भडका उडाला. यात प्रेमाचा चहा या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
fire in manikbag due to cylinder leak sai premacha chaha shop pune
fire in manikbag due to cylinder leak sai premacha chaha shop pune sakal

सिंहगड रस्ता : माणिकबाग डीपी रस्ता येथील साई प्रेमाचा चहा या दुकानास आग लागली. आगीत दुकानातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभाकर उमराटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी गॅस गळतीने ही आग लागली तसेच दुकानात उपलब्ध असलेल्या अग्निशमन साधनांच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही. तात्पुरती आग विझली, आणि लगेचच भडका उडाला. यात प्रेमाचा चहा या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

चहाच्या दुकानातील सर्व साहित्य जळले. तसेच शेजारच्या दुकानाचा फलक आणि प्रेमाचा चहा या दुकानाचा फलक आगीत जळले. सिंहगड अग्निशमन केंद्राची गाडी या ठिकाणी तात्काळ आली होती. प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तांडेल पांडुरंग तांबे, अग्निशमन जवान सतीश डाकवे, तुषार करे, संजू चव्हाण, संदीप पवार, मदतनीस जाधव यांनी आग विझवण्याचे काम केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com