esakal | पुण्यातील कोळेवाडी हद्दीत वणवा; वसुंधरा दिनादिवशीच वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात

बोलून बातमी शोधा

पुण्यातील कोळेवाडी हद्दीत वणवा; वसुंधरा दिनादिवशीच वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात

पुण्यातील कोळेवाडी हद्दीत वणवा; वसुंधरा दिनादिवशीच वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात

sakal_logo
By
किशोर गरड

दत्तनगर : कात्रज घाट डोंगररांगा मधील वणव्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा मुंबई बंगळुरू महामार्गावरील नवीन बोगदा आणि कोळेवाडी शिवारातील डोंगररांगा परिसरात वणव्याने पेट घेतला आहे. आज जागतिक वसुंधरा दिनादिवशीच वणवा पेटल्याने, वनविभागाचे वनसंवर्धना संदर्भात असणारे औदासीन्य दिसून येते आहे. ८ एप्रिल रोजी कात्रज घाटातील डोंगररांगा मध्ये वणवा पेटला होता. या सतत लागणाऱ्या आगीमुळे वन आणि वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सतत पेटणाऱ्या वणव्याची कारणे मात्र अद्यापही वनविभागाला सापडत नसल्याची खंत परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.काहीवेळा डोंगरावरील जुने गवत जाळले तर नवीन गवत जोमात उगवते. हा गुरे चारणाऱ्या लोकांचा गैरसमज असतो. त्यामुळे ही आग लावण्यात येत असते.

हेही वाचा: पुण्यात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणारा फार्मासिस्ट गजाआड; प्रिस्क्रीप्शन चोरुन मिळवायचा इंजेक्शन

परंतु, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर असता गुराखी आग लावणे शक्य नसल्याचे कोळेवाडीतील ग्रामस्थ सांगत आहेत. याशिवाय, डोंगरांवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांकडून पेटलेल्या सिगारेटी, किंवा केलेल्या पार्ट्या यातून आग लागण्याची शक्यताही ग्रामस्थ वर्तवित आहेत. परिसरातील डोंगरामध्ये विविध वन्यजीवांचे अस्तित्व आहे.परंतु सतत पेटणाऱ्या वणव्याने वनसंपदेसह वन्यजीव प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गांवर आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाकडून वनसंवर्धनाविषयीचे धोरण कुचकामी ठरत असून. वनरक्षणासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊल उचलण्याची अपेक्षा आहे.