शॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग

​अजित घस्ते
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

सहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या वायरला शॉर्ट सर्किट झाल्याने क्रीडा संकुलात आग सकाळी 11:53 वाजता आग लागली. क्रीडा स्टोरेजमधील लाकडी दरवाजे, जिम साहित्याने पेट घेतला. यावेळी शेजारील अंगणवाडीला देखील आग लागली. लहान मुलांनी धूर येत असल्याचे शिक्षिकेला दाखवले त्यामुळे वेळीच शिक्षिकांनी मुलांना सुखरुप बाहेर काढले. आगीची माहिती मिळताच कात्रज अग्निशामक दलातील जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नसून क्रीडा साहीत्य व अंगणवाडीतील कपाट व खेळणी जळाली.

बाल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी अंगणवाडी आठ मुले आली होती. मात्र अचानकपणे आग लागल्याने येथील अंगणवाडी शिक्षिका शैलजा भोसले यांनी वेळेत मुलांना बाहेर काढले. शैलजा भोसले म्हणाल्या,  ''चव्हाण नगर येथील बालविकास प्रकल्प योजने अंतर्गत क्र.139 अंगणवाडी भरते. अंगणवाडीतील एकूण 25 पटसंख्या असून दिवाळी निमित्ताने मुले सुट्टीला गेल्यामुळे आज आठ मुले उपस्थित होती. आज बाल दिनानिमित्ताने मुलांना खाऊ वाटप करण्यात येणार होता. मुलांना मनोरंजनासाठी कार्यक्रम घेण्यात येणार होता. परंतु आग लागल्याने मुले भयभीत झाली होती. वेळेत मुलांना बाहेर काढले. मुले सुखरूप आहेत हेच आमचे भाग्य मानते.''

यावेळी नगरसेवक आबा बागुल, महेश वाबळे, राजेंद्र शिळीमकर हे उपस्थित राहून अंगणवाडीतील साहित्य देण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक महेश वाबळे यांनी क्रीडा संकुलाचे ऑडिट झाले पाहिजे अशी मागणी केली. यावेळी कात्रज, भवानी पेठ, कोंढवा येथील अग्निशामक जवान उपस्थित होते. सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय नागळकर म्हणाले,'शॉर्ट सर्किटमुले आग लागली असून तीन अग्निशमन बंब व एक वॉटर टँकर घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले.''

Web Title: fire in Jagtap Sports Complex due to short circuit