कुरकुंभ एमआयडीसीत लागलेली आग आटोक्यात; पुणे-सोलापूर महामार्ग लवकरच सुरू (व्हिडिओ)

सावथा नवले
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये लागलेली भीषण आग आटोक्यात आली असून पुणे-सोलापूर महामार्ग लवकरच चालू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कुरकुंभ एमआयडीसीत लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. परंतु मोठ्या प्रयत्नानंर अग्मिशामन दलाच्या जवानांना यश आले आहे. 

कुरकुंभ (पुणे) : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये लागलेली भीषण आग आटोक्यात आली असून पुणे-सोलापूर महामार्ग लवकरच चालू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कुरकुंभ एमआयडीसीत लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. परंतु मोठ्या प्रयत्नानंर अग्मिशामन दलाच्या जवानांना यश आले आहे. 

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत कुरकुंभ एमआयडीसीमधील अल्काईल अमाईन्स या कंपनीला बुधवारी (ता. 14) रात्री आग लागली. आगीत कंपनीच्या आत काही स्फोट झाले व आगीचे मोठे लोट बाहेर पडले. आग वाढत असल्याने कुरकुंभ, मळद, जिरेगाव व परिसरातील रहिवशांनी घरे सोडली होती.

कुरकुंभ एम.आय.डी.सी.मध्ये भीषण आग

परिसरातील दहा किलोमीटर परीघातून आग दिसत असल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. आगीचे नेमके कारण मात्र स्पष्ट झाले नाही. एमआयडीसी मधील अन्य कंपन्यांनी आपल्या कामगारांना बाहेर जाण्याच्या सूचना केल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire in Kurkumbh MIDC are contol Pune-Solapur highway starts soon