स्कूलमधील विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेचे धडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

कर्वेनगरची शाळा प्रथम
‘ज्युनियर फायर सेफ्टी चॅम्पियन’ या विज्ञान प्रकल्प स्पर्धेत ३२ शाळांनी घेतला सहभाग घेतला होता. यामध्ये कर्वेनगरच्या महिला आश्रम स्कूलने प्रथम क्रमांक, खडकीतील एसव्हीएस हायस्कूल द्वितीय क्रमांक आणि कॅम्पच्या एसएम चोक्‍सी हायस्कूल तृतीय क्रमांक पटकावला आहे.

पुणे - सेफ किड्‌स फाउंडेशन, हनिवेल, पुणे महापालिका आणि पुणे मेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या (पीएमआरडीए) अग्निशमन विभागातर्फे अग्नी सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले. या अंतर्गत खडकी येथील सेंट जोसेफ बॉइज स्कूलमधील विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षा प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रात्यक्षिकाचा एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला आणि आगीसंदर्भात आपत्कालीन तयारीचे महत्त्व जाणून घेतले. अग्निशामक यंत्रणेच्या विविध उपकरणांबाबत पीएमआरडीएच्या सुनील इंगवले, सुजित पाटील आणि विनय महाजन यांनी माहिती दिली.

पुणे : ट्रॅक्‍टरची ट्रॉली अंगावर पडून चालकाचा मृत्यू

पुण्याच्या अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे म्हणाले, ‘‘आजच्या काळात विद्यार्थ्यांना अग्निशामक उपाययोजना व त्यासंबंधी कौशल्याचे प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे.’’ देशभर दरवर्षी २१ जानेवारी रोजी ‘नॅशनल फायर ॲन्ड इव्हॅक्‍युएशन ड्रील डे’ साजरा केला जातो. 

या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विविध शाळा, समुदाय आणि सोसायट्या, अशा ३२ ठिकाणी अग्निसुरक्षा प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. तसेच आंतरशालेय स्पर्धेचेही आयोजन केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire Security Training for School Student