पुणे : चंदननगर येथील कपड्याच्या दुकानाला आग

fire
fire

पुणे : चंदननगर येथील भाजी मार्केटमधील हनुमान मंदिराजवळ असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. येरवडा अग्निशमन दलाने काही मिनिटातच घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले.

अग्निशामक दलाच्या जवानांनी घन पोगरच्या साहाय्याने 5 मिनिटात शेटर उघडले व फर्स्ट स्टेडच्या साहाय्याने पाणी मारून दुकानामधील आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीमध्ये दुकानातील कपडे जळून खाक झाले आहेत.

यावेळी येरवडा अग्निशामक केंद्राचे प्रभारी उपकेंद्र प्रमुख सुभाष जाधव तसेच तांडेलआंबेकर, वाहन चालक हनुमंत चकोर फायरमन खराबी, खांडेभराड, घुंडरे यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com