पुण्यात सिंहगड रस्त्यावर सोसायटीत आग; गाड्या जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

सिंहगड रस्त्यावरील राष्ट्र सेवा दलाच्या समोरील विघ्नहर्ता सोयायटीमध्ये शनिवारी रात्री दीड वाजता आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात  आणण्यात आली.

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पर्वती पायथा येथे एका सोसायटीतील पार्किंगमध्ये शनिवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील राष्ट्र सेवा दलाच्या समोरील विघ्नहर्ता सोयायटीमध्ये शनिवारी रात्री दीड वाजता आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात  आणण्यात आली. मात्र, या आगीत 12 दुचाकी आणि ती‌न चाकी पियाजो जळून खाक झाल्या आहेत. इमारतीतील भाडेकरूनेच ही आग लावली असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. 

दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल‌ करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire in society at Singhgad Road in Pune