वारजे माळवाडीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, जीवितहानी नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

वारजे माळवाडी - वारजे माळवाडी येथील जुना जकात नाका परिसरातील जनरल व्हरायटी दुकानाला रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक दलाला वेळेत घटनेची माहिती मिळाल्यामुळे ही आग लवकर आटोक्यात आली. दुकान बंद असल्यामुळे आणि रात्री दुकानात कोणी नसल्याने मोठा धोका टळला.  

आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याची माहिती अग्निशामक केंद्राचे प्रमुख गजानन पाथरूडकर यांनी अशी दिली. या दुकानात विविध प्रकारचे स्टेशनरी साहित्य होते. त्यात साधारण प्लॅस्टिकच्या वस्तू जास्त होत्या. अग्निशामक दल घटनास्थळी पोचल्यावर साधारण पंधरा ते वीस मिनिटात आज पूर्णपणे विझवली.

पाथरूडकर यांच्या समवेत आग विझवण्यासाठी राजेश कुलकर्णी, पंढरीनाथ उभे, राहून इथापे व विजय सुतार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

Web Title: Fire at the stationery shop in Warje Malwadi