पुण्यात मोबाईल शॉपमध्ये आग; अग्निशामक दलाच्या जवानाने सुट्टी असतानाही बजावले कर्तव्य

Firefighters Control Fire in mobile shop while on leave in pune
Firefighters Control Fire in mobile shop while on leave in pune
Updated on

पुणे : छोट्या मोबाईल दुकानाला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता कात्रज येथे घडली. अग्निशामक दलाने ही आग काही वेळातच विझविले. विशेषत: सुट्टीवर असतानाही अग्निशामक दलाच्या जवानाने प्रसंगवधान राखत पेट्रोल पंपापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आग इतरत्र पसरु नये यासाठी स्वत: स्थानिक उपकरणे घेऊन आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, अग्निशमन दलाच्या कोंढवा येथे ड्युटीस असलेले व कात्रजमध्ये राहणारे देवदूतचे जवान राहुल सुभाष जाधव यांची शुक्रवारी सुट्टी असल्याने ते बेलदरे पेट्रोल पंपानजीक राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राकडे आले होते.

त्यावेळी त्यांना नागरिकांचा आरडाओरडा ऐकू आला. त्यांना तेथे एका दुकानामध्ये आग लागल्याचे दिसले. त्यांनी तातडीने तेथे धाव घेत दुकानाचे कुलूप एका दगडाच्या साह्याने तोडले व अग्निशमन दलाला तातडीने आगीची घटना कळविली. कात्रज अग्निशमन केंद्रातील वाहन येईपर्यंत जवान राहुल जाधव यांनी पेट्रोल पंप जवळ असल्याचे गांभीर्य ओळखून तेथीलच अग्निरोधक उपकरणाचा वापर करत आग आटोक्यात आणली व धोका दुर केला. त्यानंतर तिथे आलेल्या कात्रज अग्निशमन दलाचे जवानांनी पाण्याचा मारा करत आग पुर्ण विझवली.

हृदयद्रावक : वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मुलगा बुडाला

उपस्थित नागरिकांनी जवान राहुल जाधव यांनी सुट्टीवर असताना देखील दाखवलेल्या कर्तव्याचे कौतुक केले. जवान जाधव यांचे वडिल सुभाष जाधव हे देखील पुणे अग्निशमन दलाकडे प्रभारी अधिकारी असून ते राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com