
Firefighter injured during Undri blaze; Pune Fire Brigade continues to operate without essential fire suits.
Sakal
पुणे: पुणे महापालिकेच्या अग्निशामक विभागात दीड वर्षापूर्वी नव्या कर्मचाऱ्यांची भरती झाली. पण त्यांना अद्याप ‘फायर सूट’ आणि गणवेश मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्याच जिवाला धोका निर्माण झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवताना काही कर्मचारी भाजल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.