पूर्ववैमनस्यामधून दत्तवाडीत गोळीबार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

पुणे - दोन गटांतील जुन्या भांडणावरून एका तरुणावर सराईत गुन्हेगाराने पिस्तुलामधून गोळी झाडली. ही घटना रविवारी मध्यरात्री दत्तवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. दरम्यान, दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिली आहे. 

सूरज भालचंद्र यशवद (रा. राजेंद्रनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयूर भगरे (वय 21) याने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी रोहित उटाडा (रा. दत्तवाडी) याच्यासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भगरे हा रविवारी मध्यरात्री दत्तवाडीत सूरज व अन्य मित्रांसोबत बोलत होता. तर, श्रीकृष्ण मित्रमंडळाजवळ सर्व जण रोहितचा वाढदिवस साजरा करत होते. त्या वेळी रोहितचा मित्र अक्षय मारणे ऊर्फ मट्टा याने एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून साथीदारांना बोलावून घेतले. यानंतर सर्वांनी मयूरला मारहाण केली. तर, रोहितने "एकालाही जिवंत सोडत नाही' असे धमकावत पिस्तुलातून गोळीबार केला. त्यामध्ये मयूरचा मित्र सूरजला कमरेखाली गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्यास तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. दरम्यान, परस्पर विरोधी तक्रारीमध्ये फिर्यादी वैभव रोकडे यांनी रोहित उटाला याचा वाढदिवस साजरा करताना झेडएल ग्रुपच्या व्यक्ती बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर गाड्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर त्यांनी घराच्या दरवाजावर दगडाने व लाथा मारत धमकाविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

Web Title: firing in Dattawadi