पुण्यात भरदिवसा एकावर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे : भरदिवसा पुण्यात एका अज्ञात व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघांनी एकावर पिस्तुलातुन गोळी झाडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात शनिवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार घडला. अचानक झालेल्या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या विद्यापीठ चौकात खळबळ उडाली आहे.

दरम्यान जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णलयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. समीर किसन येनपूरे असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी दाखल झाले असून तपास सुरु आहे. चित्रिकरणाद्वारे गुन्हेगारांचा शोध आहे.
 
Web Title: Firing at University Chowk in pune