विषयनिवडीचे स्वातंत्र्य; सेन्सॉरच्या मान्यतेचे बंधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेतील विषयनिवडीवर लादलेले निर्बंध संयोजकांनी मागे घेतले आहेत; परंतु विषयांना, संहितांना नाटकासाठी ‘सेन्सॉर बोर्डा’ची मान्यता आवश्‍यक आहे. 

पुणे - फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेतील विषयनिवडीवर लादलेले निर्बंध संयोजकांनी मागे घेतले आहेत; परंतु विषयांना, संहितांना नाटकासाठी ‘सेन्सॉर बोर्डा’ची मान्यता आवश्‍यक आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

स्पर्धेसाठी हिंदू-मुस्लिम, काश्‍मीर-३७० कलम, रामजन्मभूमी-बाबरी मशीद यांसारखे संवेदनशील आणि जातीय तेढ निर्माण करणारे विषय सादरीकरणासाठी वापरू नयेत, असे बंधन लादले होते; परंतु टीकेनंतर ही बंधने रद्द करावी लागली आहेत.

Video : शास्त्रीय संगीत चिरकाल टिकेल - वीणावादक जयंती कुमरेश

संयोजकांनी निवेदनात म्हटले आहे, सातत्याने त्याच त्या विषयाची मांडणी कमी व्हावी, मुलांनी जाती-धर्मापलीकडे जाऊन नवीन विचार करावा, जातीधर्मामध्ये तेढ निर्माण होईल, असे विषय टाळावेत, अशी आमची खूप प्रामाणिक भावना आहे आणि होती. या अनुषंगाने यंदा काही नियम स्पर्धेच्या नियमावलीमध्ये समाविष्ट केले होते; परंतु दुर्दैवाने त्याचा खूप चुकीचा अर्थ काढण्यात येतो आहे.

प्रयोग सादर करण्यापूर्वी संघांनी नाटकासाठी सेन्सॉर बोर्डाची परवानगी घेणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रयोगांना परवानगी दिली जाईल. त्यानंतर कुठलीही जबाबदारी संयोजक घेणार नाहीत.
- अजिंक्‍य कुलकर्णी, संयोजक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: firodiya karandak sensor control permission