वाहतूक पोलिसांना प्रथमोपचार प्रशिक्षण

first aid
first aid

हडपसर : अपघाताच्या ठिकाणी तात्काळ मदत वा प्रथमोपचार न मिळाल्याने अपघातग्रस्तांना प्राणास मुकावे लागते. यासाठी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी म्हणून केवळ रूग्णवाहिका व डॅाक्टरांची वाट न पाहता वाहतूक पोलिसांनी जखमींवर प्रथमोपचार करावेत यासाठी वाहतूक पोलिस व अधिका-यांना प्रथमोपचार कसे करावेत याबाबत कार्यशाळेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. 

हडपसर वाहतूक शाखा, सह्याद्री सुपर स्पेशालीटी हॅास्पीटल व बी. व्ही. जी. यांच्या संयुक्त विदयमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळत परिमंडळ चार मधील हडपसर, वानवडी, विश्रांतवाडी, कोंढवा, खडकी आणि येरवडा वाहतूक शाखेतील ५० पोलिस कर्मचारी व अधिका-यांनी सहभाग घेतला. 

याप्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त देवीदास पाटील, हडपसर वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक जे. डी. कळसकर, उपनिरिक्षक ज्ञानदेव म्हेत्रे, विजय गायकवाड, डॅा. प्रमाण भोसले, डॅा. अतुल वायकोळे, डॅा. विठ्ठल बोडखे, डॅा. अली बशीर, डॅा. अनिष कुमार, डॅा. केदार पाध्ये, डॅा. स्मिता पालभावे, डॅा. केतन आपटे, डॅा. अशोक वैरागडे उपस्थित होते. 

पोलिस निरिक्षक जे. डी. कळसकर म्हणाले, वाहतूक शाखेचे कर्मचारी अधिकारी हे ब-याच वेळा अपघाताच्या वेळी घटनास्थळी पोहचतात. त्यांना प्रथमोपचारासची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे रूग्णास जीवदान मिळू शकते. त्यामुळे पोलिस उपआयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com