
कोणताही बडेजावपणा वा सुरक्षिततेचा बाऊ न करता ही भेट झाल्याने टाटा कोथरूडमध्ये येऊन गेले ही चर्चा समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर सायंकाळी लोकांना समजली.
कोथरूड (पुणे) : रविवारी दुपारची वेळ. कोथरूडमधील वूडलॅंड सोसायटीचा शांत परिसर आजही शांत होता. टाटा मोटर्स कंपनीच्या दोन नव्या गाड्या सोसायटीत आल्या. या गाडीतून एक उंचेपुरे व्यक्तिमत्त्व उतरले. तोंडाला मास्क, निळसर रंगाच्या पॅंटवर नीळसर रंगाचा चौकटीचा शर्ट परिधान केलेली ही व्यक्ती म्हणजे चक्क टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा होते.
- पुन्हा गाठी ऋणानुबंधाच्या; 4 मुलींच्या भविष्यासाठी 8 वर्षांनी थाटला संसार
अतिशय सहजतेने ते सोसायटीमधील हार्मनी इमारतीमध्ये राहत असलेल्या इनामदार यांच्या घरी गेले. इनामदार हे टाटा यांच्या कंपनीत काम करीत होते. आपल्या या जुन्या सहकाऱ्याला भेटायला टाटा आवर्जून आले होते. त्यांच्या आगमनाबाबत कोणालाही खबर नव्हती. ते कोथरूडमध्ये येणार याची कोठेही वाच्यता झालेली नव्हती, किंबहुना त्याची योग्य दक्षता घेण्यात आली होती.
कोणताही बडेजावपणा वा सुरक्षिततेचा बाऊ न करता ही भेट झाल्याने टाटा कोथरूडमध्ये येऊन गेले ही चर्चा समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर सायंकाळी लोकांना समजली. एक मित्र आपल्या मित्राला भेटायला आला, ही सर्वसामान्य घटना, पण तो मित्र जेव्हा रतन टाटांसारखे व्यक्तिमत्त्व असते तेव्हा चर्चा तर होणारच... असाच काहीसा अनुभव वुडलॅंड सोसायटीमधील रहिवाशांबाबत घडला.
- राज्य सरकारचा स्टॅम्प ड्यूटी सवलतीचा निर्णय योग्य पण...
रतन टाटा परतत असताना पार्किंगमध्ये अभिजित मकाशीर आणि त्यांची मुलगी आदिश्री यांनी त्यांच्याशी संवाद साधला. टाटांच्या या भेटी निमित्ताने पुन्हा एकदा त्यांचा साधेपणा व मनाचा मोठेपणा अनुभवायला मिळाल्याची भावना सोसायटीतील रहिवाशांनी सांगितली.
माणुसकी जपणारा उद्योगपती... जुन्या सहकाऱ्याला भेटण्यासाठी टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा कोथरूडमध्ये आले होते. टाटा यांच्या अचानक भेटीमुळे पुणेकरांना सुखद धक्का बसला असून पुन्हा एकदा त्यांचा साधेपणा आणि मनाच्या मोठेपणाचे दर्शन घडले आहे. #PuneNews #Kothrud @RNTata2000 #TATA pic.twitter.com/EpRVNrwUhK
— sakalmedia (@SakalMediaNews) January 7, 2021
- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)