शिरूर तालुक्यात जांबूत गावात कोरोनाचा शिरकाव; भाजी विक्रेता पॅाझिटिव्ह

first Corona positive was found in Jambut village of Shirur taluka
first Corona positive was found in Jambut village of Shirur taluka
Updated on

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील जांबूत येथे भाजी विक्रेता कोरोना पॅाझिटिव्ह आढळल्याने गावात पहिल्यांदाच घबराहटीचे वातावरण पसरले आहे. भाजी विक्रेता पुणे सारख्या मोठ्या बाजारपेठेतून फिरून आल्याने ही लागण झाली असल्याने परिसरातील गावात चांगलीच घबराहट पसरली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाव बंद ठेवून जांबूत येथील ग्रामसुरक्षा दलाने चांगलीच कामगिरी केली होती. गाव बंद बरोबर आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात आला होता. यासाठी येथील ग्रामस्थांनी चांगलाच सहभाग दाखवला. पण, भाजी पाला व किराणा दुकानाच्या माध्यमातून गावातील व्यवहार चालूच होते. किती दिवस लॅाकडाऊन राहिल याचा अंदाज नसल्याने नागरिकांनी दिवाळी सारखी खरेदी या दुकानातून केली. अखेर पहिल्यांदाच गावात कोरोनाचा शिरकाव झाला असून गावात घबराहट निर्माण झाली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक; शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन

दुकानदार मात्र, कोणाचेच ऐकत नसल्याने सर्रास पुणे, नगर येथून खरेदी करून दुकाने थाटण्याचा अट्टहास करत असल्याचे येथील नागरीक सांगतात. भाजीपाला विक्रेते देखील अट्टहासाने परवाने असल्यासारखी जीवनावश्यक वस्तू म्हणून पुणे, नगर, नाशिक येथून खरेदी करून माल घेऊन येऊ लागली आहेत. नुकतीच येथे एक भाजी विक्रेत्याला त्रास होऊ लागल्याने त्याला पुणे येथे हलविण्यात आले आहे. गावात तातडीने फवारणी करण्यात आली आहे. या भाजी विक्रेत्याच्या अनेक जण संपर्कात आले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. कवठे येमाई, कान्हूर मेसाई येथे कामगार तलाठी कार्यरत नसल्याने येथील कोरोनाची परिस्थीती गंभीर असल्याचे पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे यांनी सांगितले.   

डिप्लोमाच्या प्रवेशाला मुहूर्त सापडेना; वेळापत्रकाकडे लागले विद्यार्थ्यांचे लक्ष!

''जांबूत गावात पहिल्यांदाच कोरोना रूग्ण आढळून आला असल्याचे शासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. जे संपर्कात आले असतील त्यांनी तत्काळ काळजी घेऊन क्वारंटाईन व्हा. नागरिकांमध्ये मिसळू नका. कोणालाही त्रास होत असेल तर, तत्काळ आरोग्य विभागाला माहिती द्या.''असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी यांनी केले आहे. 

परीक्षा घेताना 'एमपीएससी'चीच लागणार कसोटी; उमेदवारांसाठी घेतला 'हा' निर्णय!​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com