esakal | कोरोनाच्या पहिल्या डोसपासून वीस लाख नागरिक वंचित
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

कोरोनाच्या पहिल्या डोसपासून वीस लाख नागरिक वंचित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २० लाख ३३ हजार ३९५ नागरिकांना अद्याप कोरोनाचा पहिला डोससुद्धा मिळू शकला नाही. याशिवाय ३९ लाख ३१ हजार ६५२ नागरिकांना दुसरा डोस मिळणे बाकी आहे. यानुसार पुणे जिल्ह्यातील कोरोना लसीकरण पूर्ण होण्यासाठी जिल्ह्याला आणखी किमान ७९ लाख ९८ हजार ४४२ डोस लागणार आहेत.

शहर व जिल्ह्यात अठरा वर्षे वयापुढील एकूण ८५ लाख ३९ हजार ७०६ नागरिक आहेत. हे सर्व जण कोरोना लसीकरणासाठी पात्र आहेत. यापैकी आतापर्यंत ६५ लाख ०६ हजार ३११ जणांनी कोरोना लसीकरणात पहिला डोस घेतला आहे. पहिला डोस घेतलेल्यांपैकी २५ लाख ७४ हजार ६५९ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. यामुळे शहर व जिल्ह्यातील नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस मिळून आतापर्यंत एकूण ९० लाख ८० हजार ९७० डोस घेतले आहेत.

हेही वाचा: शरद पवार यांनी काँग्रेसवर केलली टीका अचूक आहे - दानवे

पुणे जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ कोरोना पासून सुरु झाले आहे. मागील नऊ महिन्यांपासून सातत्याने हे लसीकरण सुरु आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, शिक्षक, ६० वर्षे वयापुढील सर्व, ४५ वर्षे वयापुढील सहव्याधी असलेले आणि नसलेले आणि त्यानंतर किमान अठरा वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींचे लसीकरण टप्प्याटप्याने सुरु केले आहे. सध्या १८ वर्ष वयापुढील सर्वांचे कोरोना लसीकरण केले जात आहे.

महिनानिहाय झालेले एकूण लसीकरण (दोन्ही डोस मिळून)

  • जानेवारी २०२१ --- २५ हजार १४४

  • फेब्रुवारी --- १ लाख १८ हजार ८०२

  • मार्च --- ७ लाख ४० हजार ६७५

  • एप्रिल --- १४ लाख ८३ हजार २९७

  • मे २०२१ --- ५ लाख ४३ हजार ४७३

  • जून --- १५ लाख २८ हजार ९६६

  • जूलै --- १७ लाख ८१ हजार ५६१

  • अॉगस्ट --- १८ लाख ८० हजार ०२९

  • सप्टेंबर ( १२ तारखेपर्यंत) --- ९ लाख ३८ हजार ८०४

  • एकूण --- ९० लाख ८० हजार ९७०

loading image
go to top