Vidhan Sabha 2019 : चिंचवड विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 6.10 टक्के मतदान

chinchwad.jpg
chinchwad.jpg

Vidhan Sabha 2019 : चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या पहिल्या दोन तासांमध्ये केवळ 6.10  टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून मतदानात चांगला प्रतिसाद लाभला, मात्र अनेकांची नावे मतदार यादीत नसल्यामुळे ते परत घरी गेले. मतदान केंद्रांवर यादीत नाव बघण्याची पुरेशी व्यवस्था अनेक ठिकाणी नव्हती तसेच कार्यकर्त्यांचाही  उत्साह कमी दिसला.  

पावणे दहाच्या दरम्यान ढगाळ हवामान गायब झाल्यानंतर  सूर्याचे दर्शन घडले. त्यानंतर नागरीकांची पावले मतदान केंद्रांकडे वळू लागली. अनेक मतदान केंद्रांवर पारंपारिक लॅपटॉपची जागा स्मार्टफोनने घेतल्याचे प्रकर्षाने जाणवले. अनेक मतदारांना मोबाइलवर एसएमएस आल्यामुळे त्यांना मतदान करणे सोपे झाले. ज्या मतदारांची नावे यादीत नव्हती त्यांनी नावे वेबसाईटवर शोधण्याचा प्रयत्न केला मात्र, वेबसाईटचा वेग कमी असल्यामुळे कामासाठी वेळ लागत असल्याने मतदार त्रस्त झाले.

 चिंचवड येथील अभ्यासिका मतदान केंद्रावर मतदानास गेलेल्या अमित लोढा या  दिव्यांग मतदारकडे स्लिप असूनही ओळखपत्राची हार्ड कॉपी नसल्यामुळे त्याला मतदान करून देण्यात आले नाही. त्याने आधार कार्ड व पॅन कार्डची मोबाईलवर प्रत दाखवली तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी तरीही हार्ड कॉपीचाच आग्रह धरला होता. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या लोढा यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.  

चिंचवड येथील दळवीनगर मधील पांढरकर वस्ती येथे मतदारांनी अयोग्य प्रकारे वाहने लावली होती. त्यामुळे अन्य नागरीकांना त्यांची वाहने पुढे घेऊन जाता येत नव्हती. या कारणावरून नागरिक आणि पोलिस यांच्यामध्ये तीव्र शाब्दिक बाचाबाची झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com