ग्राहक हिताला सर्वोच्च प्राधान्य - विभागीय उपायुक्त पिंपळगावकर

Frist priority is consumer interest says Jayant Pimpalgaonkar
Frist priority is consumer interest says Jayant Pimpalgaonkar
Updated on

पुणे : ग्राहक हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण असून, त्यासाठी ग्राहक हिताचे विविध निर्णय घेण्यात येत आहेत. ग्राहकांचे संपूर्ण हित जोपासले जाणार असल्याचा विश्वास विभागीय उपायुक्त (पुरवठा) जयंत पिंपळगावकर यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शिवाजीनगर बसस्थानक येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन पिंपळगावकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंदे, अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल, एसटीच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रशेखर चव्हाण, ग्राहक पंचायत सदस्य लेले आदी या वेळी उपस्थित होते.

या टिकटॉक गर्लनं लावलं जगाला वेड

पिंपळगावकर म्हणाले, ग्राहक हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. सरकारने ग्राहकांच्या तक्रारीवर जलद गतीने निर्णय होण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा केला आहे. ग्राहक संरक्षण कायदा व यंत्रणेच्या कार्याची माहिती व ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव सातत्याने होणे आवश्यक आहे. ग्राहकांचे अधिकार व कर्तव्याबाबत प्रबोधन आवश्यक असून, यासाठी स्वंयसेवी संस्थांचा सहभाग आवश्यक आहे.

संजय राऊत घेणार असलेली शरद पवारांची प्रकट मुलाखत रद्द 

ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोग आहेत. ग्राहक संरक्षण व तक्रारीचे जलद निवारण करण्यात येते. ग्राहकांच्या हक्क व कर्तव्याची माहिती करून देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com