esakal | विद्यार्थी आणि पालकांनो, जानेवारीच्या शेवटी प्रथम सत्र परीक्षा होण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Students_Exam

- सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आव्हान
- येत्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्‍यता

विद्यार्थी आणि पालकांनो, जानेवारीच्या शेवटी प्रथम सत्र परीक्षा होण्याची शक्यता

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दोन टप्प्यात अंतिम वर्ष आणि अंतिम पूर्व वर्षातील बॅकलॉग आणि श्रेणीसुधार परीक्षा घेतली. आता प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षाच्या पहिल्या सत्राच्या नियमित परीक्षा घेण्याचे मोठे आव्हान विद्यापीठापुढे आहे. ही परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेला सुरवात होण्याची शक्‍यता आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात पारंपरिक अभ्यासक्रमांचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाचे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष वगळता इतर वर्षाचे प्रथम सत्राचे ऑनलाइन वर्ग जुलै-ऑगस्ट महिन्यात सुरू झाले. प्रथम सत्रातील बहुतांश अभ्यासक्रम संपत आला असून, विद्यार्थ्यांना आता थेट महाविद्यालय सुरू होण्याची आणि प्रथम सत्राच्या परीक्षा कधी होणार याची प्रतीक्षा आहे.

2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी?

ऑक्‍टोबर महिन्यात पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या अडीच लाख विद्यार्थ्यांची परीक्षा दिली, त्यापैकी दोन लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. यामध्ये अनेक तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यात सुधारणा करत डिसेंबर महिन्यात बॅकलॉग व श्रेणी सुधारच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या. ज्या विषयांच्या परीक्षा झाल्या, त्यांचे निकाल देखील तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच बॅकलॉग परीक्षेत प्रोक्‍टर्ड मेथडचा वापर केल्याने गैरप्रकारांवरही चाप बसला. मात्र, आता प्रथम सत्राच्या परीक्षांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

"ऑनलाइन क्‍लासेस झाल्याने शिकवलेले संपूर्ण समजलेले नसले तरी आमचा प्रथम सत्राचा अभ्यासक्रम जवळपास संपत आला आहे. जानेवारी महिन्यात द्वितीय सत्र सुरू करण्यात येईल, पण त्यापूर्वी प्रथम सत्राच्या परीक्षा कधी होणार हे विद्यापीठाने लवकर स्पष्ट करावे. तसेच ही परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन याबाबतही स्पष्टता आणावी.''
- संकेत बोऱ्हाडे, बीएससी तृतीय वर्ष, विद्यार्थी

CBSE बोर्डच्या विद्यार्थ्यांनो, परीक्षांच्या तारखा गुरुवारी होणार जाहीर!​

"प्रथम सत्र परीक्षा जानेवारी शेवटचा आठवडा किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकतील, त्या ऑफलाइन होणार की ऑनलाइन याबाबत परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय होईल.''
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा

"पहिल्या सत्राचा सरासरी 90 टक्के अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला आहे, विद्यापीठाकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, त्यानंतर द्वितीय, तृतीय वर्षाचेही अर्ज भरून घेतले जातील.''
- डॉ. पी. बी. बुचडे, प्राचार्य, गरवारे महाविद्यालय

न्यूमोनियावर आली पहिली स्वदेशी लस; सिरमच्या 'न्यूमोसिल'चे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

विद्यार्थ्यांची संख्या सहा लाख
व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रथम वर्ष वगळता इतर सर्व वर्ष आणि अभ्यासक्रमांचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रथम सत्रात सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाला घ्यायची आहे. ही परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी कमी कालावधीत ही परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालयांना तयारी करावी लागणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)