यंदा प्रथमच ऑनलाइन पशुगणना 

यंदा प्रथमच ऑनलाइन पशुगणना 

पुणे  - राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजना राबविणे सुलभ जावे, यासाठी पशुगणना हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने टॅबद्वारे ही गणना होणार आहे, अशी माहिती राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी दिली. 

देशात जनगणना ही दर दहा वर्षांनी घेतली जाते. त्याच धर्तीवर पशुगणना ही दर पाच वर्षांनी केली जाते. पहिली पशुगणना ही 1919-20 या दरम्यान घेण्यात आली होती. यंदा जी गणना करण्यात येणार आहे ती विसावी गणना असणार आहे. जानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. याप्रसंगी आयुक्त कांतिलाल उमाप उपस्थित होते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यात या पशुगणनेची सुरवात येत्या एक ऑक्‍टोबरपासून होणार आहे. ही गणना 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. पशुगणना राज्यातील प्रत्येक गावात/वॉर्डात प्रत्यक्ष भेटी देऊन घरोघरी असणाऱ्या पशूंची गणना केली जाणार आहे. यंदाच्या वर्षी ही गणना ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. त्यासाठी राज्यात एकूण सात हजार 126 टॅब खरेदी करण्यात आले आहेत. प्रत्येक पशू गणनेची नोंद ही ऑनलाइन पद्धतीने टॅबद्वारे केली जाणार आहे, असेही जानकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com