जनगणनेसाठी पहिल्यांदाच ऑनलाइन माहिती 

जनगणनेसाठी पहिल्यांदाच ऑनलाइन माहिती 

पुणे - देशातील सर्वांत मोठ्या प्रशासकीय कामाची अर्थात जनगणना करण्याची तयारी सुरू झाली आहे. जनगणना करण्यासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण 3 ते 11 जूनदरम्यान यशदा येथे पार पडले. या जनगणनेत पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने माहिती संकलित होणार असून, कामकाजाच्या पद्धतीमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत. 

जनगणना आयुक्तालयाच्या नवी दिल्ली कार्यालयाने यशदा येथे प्रशिक्षण आयोजित केले होते. राज्याच्या जनगणना संचालक रश्‍मी झगडे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्‌घाटन झाले. जनगणनेची पूर्वतयारी म्हणून देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. 

राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांचे मेमध्ये नवी दिल्ली येथे प्रशिक्षण झाले होते. या प्रशिक्षकांनी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगण आणि गोवा राज्यांमधील प्रशिक्षकांना यशदा येथे प्रशिक्षण दिले. संबंधित राज्यस्तरीय प्रशिक्षक या पुढील टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील. ""प्रत्येक टप्प्यात बिनचूक काम झाल्यास प्रत्यक्ष जनगणनेची प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पद्धती आणि माहिती संस्करणाची पद्धती सुनिश्‍चित करणे शक्‍य होईल,'' असे झगडे या वेळी म्हणाल्या. 

प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी राज्यस्तरीय प्रशिक्षकांनी जिल्ह्यातील निवडक ग्रामीण व शहरी भागात चाचणीसाठी माहिती संकलित केली. प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमास देशाचे महारजिस्टार विवेक जोशी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com