Corona Virus : आम्ही कोरनामुक्त झालो: 'त्या' दांपत्यांची प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

हिंदू नवीन वर्षाच्या, पाडव्याच्या दिवशी हे दांपत्य पुन्हा नवी गुढी उभारण्यासाठी खडखडीत बरे होऊन घरी गेले. गेले 16 दिवस ते महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील विलगिकरण कक्षात उपचार घेत होते. तेथून बाहेर पडताना नायडू रुग्णालायातील अभिप्रायात हा विश्वास व्यक्त केला.
 

पुणे: “आम्ही कोरोनामुक्त झालो. निरोगी होऊन आता घरी जात आहे. इतर रुग्णही कोरोनामुक्त होतील,” असा विश्वास राज्यातील कोरोना बाधीत आढलेल्या दांपत्यांनी व्यक्त बुधवारी केला. या  कोरोनामुक्त झालेल्या या दांपत्यांना आज घरी सोडण्यात आले.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिंदू नवीन वर्षाच्या, पाडव्याच्या दिवशी हे दांपत्य पुन्हा नवी गुढी उभारण्यासाठी खडखडीत बरे होऊन घरी गेले. गेले 16 दिवस ते महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील विलगिकरण कक्षात उपचार घेत होते. तेथून बाहेर पडताना नायडू रुग्णालायातील अभिप्रायात हा विश्वास व्यक्त केला.

 
Corona Virus : पुण्यात पहिल्या २ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्‍चार्ज; आणखी 3 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सिंहगड रस्त्यावरील दांपत्य आपल्या सहजीवनाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी दुबई सहलीला गेला होते. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंचा संसर्ग त्यांना तेथे झाला. होळीच्या दिवशी, 9 मार्चला त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून ते येथून विलगिकरण कक्षात उपचार घेत होते. 
“आम्ही वैद्यकीय सल्ल्याचे तंतोतंत पालन केले. आता आमच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. आम्ही करोनामुक्त झालो आहोत. निरोगी झालो आहोत. कोरोनाचा संसर्ग झालेले इतर रुग्णही निश्चित बरे होतील. ते निरोगी होऊन घरी जातील. याची खात्री आहे,” असेही त्यांनी या अभियाप्रात म्हटले आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुड न्यूज; देशातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त

वैद्यकीय सल्ल्याचे तंतोतंप पालन केल्यास कोरोनामुक्त होऊ शकतो. तसेच, पतंप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, सरकारी यंत्रणा यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे वागल्यास आपला देशही कोरोनामुक्त होईल, अशी भावनाही यात व्यक्त केली आहे. नायडू रुग्णालयातील सर्व वैद्यकीय तज्ज्ञ, परिचारिका, कर्मचारी, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, तेथून येणारे तज्ज्ञ डॅक्टर यांचे मनःपूर्वक आभार त्या दांपत्यांनी या अभिप्रायात मानले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First two Corona patient cured and discharged in pune