पुणे : जात पंचायतीप्रकरणी पाच जणांना अटक

Crime
Crime

सासवड - गराडे (ता. पुरंदर) मालमत्तेच्या वादातून भातू समाजातील जात पंचायतीने नुकतेच एका कुटुंबाला बहिष्कृत करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सासवड पोलिसांनी सातपैकी पाच संशयित आरोपींना अटक केली. सोळशी (ता. खंडाळा) येथे एका फार्महाउसवरून त्यांना ताब्यात घेतले. सासवड न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार भातू समाजातील वारसा हिश्‍शावरून झालेल्या वादात जातपंचायतीने एका कुटुंबाला बहिष्कृत केले होते. याबाबत बहिष्कृत कुटुंबातील सुहानी ऊर्फ रिटा विकास कुंभार (रा. धनकवडी, पुणे) यांनी तक्रार दिली. त्यानुसार सुरेश रतन बिनवात, संपत पन्नालाल बिनवात, आनंद रामचंद्र बिनावत (रा. सातवनगर हडपसर), नंदू अंत्राम रजपूत (रा. वारजे जकात नाक्‍या जवळ) आणि  देवानंद राजू कुंभार (रा. धनकवडी) यांनी पोलिसांनी अटक केले. मात्र, मुन्ना रमेश कचरावत (रा. वारजे माळवाडी) व देविदास राजू चव्हाण (रा. नऱ्हेगाव) हे फरारी आहेत. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com