पिंपरीत वाहनांची तोडफोड करुन कोयत्याच्या धाकाने तरुणाला लुटणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

रविवारी (ता.2) पहाटे चारच्या सुमारास आंबेडकरनगर येथील थरमॅक्‍स चौक येथे राजेश पोपट कांबळे (वय 37) यांना आरोपींनी मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील सोळाशे रूपयांची रोकड लुटली. त्यानंतर कांबळे यांच्या टेम्पोसह परिसरातील पाच दुचाकी व सहा तीन चाकी वाहनांची तोडफोड करून आरोपी पसार झाले.

पिंपरी : कोयत्याचा धाक दाखवित तरूणाकडील रोकड लुटून अकरा वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. राहुल रामचंद्र दौड (वय 30, रा.), रोहित अश्रुबा आव्हाड (वय 21, दोघेही, रा. अजंठानगर, चिंचवड), रोहित चंद्रकांत मुद्दे आकाश चंद्रकांत मुद्दे (दोघेही रा. आंबेडकरनगर, चिंचवड), हरूण नाशीर शेख (रा. घरकुल, चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सिगारेटचे पैसे मागितले म्हणून एकास लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण 

रविवारी (ता.2) पहाटे चारच्या सुमारास आंबेडकरनगर येथील थरमॅक्‍स चौक येथे राजेश पोपट कांबळे (वय 37) यांना आरोपींनी मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील सोळाशे रूपयांची रोकड लुटली. त्यानंतर कांबळे यांच्या टेम्पोसह परिसरातील पाच दुचाकी व सहा तीन चाकी वाहनांची तोडफोड करून आरोपी पसार झाले.

एल्गारची सुनावणी कुठे होणार ? सहा फेब्रुवारीला निकाल

दरम्यान, हे आरोपी निगडीतील दुर्गानगर चौकात थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी राहुल दौड व रोहित आव्हाड यांना पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता इतर आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार रोहित मुद्दे याला सोलापूरमधील बार्शी येथून तर आकाश मुद्दे याला भोसरीतील बालाजीनगर येथून ताब्यात घेतले. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मैलापाण्यात काम करणारे घेणार मोकळा श्वास कारण...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five arrested for robbing young man and vehicles Vandalisation in pimpri